शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Published: July 15, 2014 12:13 AM

जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढून प्रशासनाप्रती असलेला रोष व्यक्त केला.

प्रशासनावर रोष : आकृतीबंधानुसार पदभरतीची मागणीयवतमाळ : जिल्हा परिषद आणि राज्य सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनस्तरावर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चा काढून प्रशासनाप्रती असलेला रोष व्यक्त केला. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला वाढीव मनुष्यबळाची तरतूद केली. या दोन्ही ठिकाणी नवीन पदे निर्माण करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र पदभरती संदर्भात कुठलीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा बोझा पडत आहे. ग्रामीण आरोग्य अभियानातील नर्सेसना कायमस्वरुपी नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सहायक यांची वेतनश्रेणी सारखीच आहे. या विभागातील आरोग्य सहायक औषध निर्माण अधिकारी यांची वेतन त्रूटी दूर करण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात दोन आरोग्य सहायक स्त्री आणि तालुका आरोग्य कार्यालयात एक आरोग्य सहायक स्त्री यांची पदे मंजूर करणे, कर्मचाऱ्यांच्या पदनामात बदल करणे, कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार विभाग स्तरावर देणे, नियमित पदोन्नत्या करणे, डाटा एंट्री आॅपरेटरचे वेतन नियमित करणे, ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी सांभाळून घेणे, आजही आरोग्य विभागात दहा हजार पदे रिक्त असतानाही पदभरती प्रक्रिया घेतली जात नाही. शासनाने या मोर्चाची दखल न घेतल्यास २१ जुलैपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हा परिषदेवर धडक देण्यात आली. या वेळी आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, एम.ए. कय्यूम, प्रमोद इंगळे, अशोक राऊत, अरुण डवरे, रमेश आवटे, दादाराव बडे, विजय बुटके, शुभांगी गावंडे, जयदेव पाटील, अलका घावडे, विलास वानखडे, वाय.एम. सैयद, देवानंद रचकुंटवार, पुरुषोत्तम जाधव, जयवंत करोडदेव, सुभाष वानरे, अनिल परचाके आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)