ओ.बी.सी. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप देण्यात यावी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, नंदुरबार, धुळे आणि पालघर या जिल्ह्यांत ओ.बी.सी.चे कमी झालेले आरक्षण पूर्ववत व्हावे, प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेला ओ.बी.सी. बॅकलॉग हा भरला गेला पाहिजे, या मागणीकरिता पांढरकवडा येथे ओ.बी.सी. बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विकास काळे, प्रमोद राऊत, ज्ञानेश्वर रायमल, अशोक मोहुर्ले, अजय ठाकरे उपस्थित होते. ओ.बी.सी.मध्ये असलेली जागृती देश मजबूत करण्याकरिता सहायभूत ठरेल, असे प्रतिपादन विलास काळे यांनी बोलताना व्यक्त केले. या बैठकीचे आयोजन आतिश चव्हाण यांनी केले होते. संचालन सचिन बोंद्रे यांनी केले. यशस्वितेसाठी विनोद भांडेकर, शालीग्राम राऊत, श्रीकांत उईके, नितीन टेकाम, नगरसेकद बंटी जुवारे, मोरेश्वर डेहणकर, मनोज भंडारकर, दिनेश पिंपळे, मनोज भोयर, नीलेश कडू, गजानन पायघन, नितीन बुरांडे, रोहित पिंपळे, नितीन कोरडकर, सूरज चलाख, अनिकेत दुधबळे, अक्षय चलाख, सुमीत कोठारे, गणेश गोतपवार, अंकुश गाऊत्रे, सूरज पिल्लेवार, अनुज गटलेवार, महेश सिडाम, प्रकाश कटकमवार, राकेश चौधरी, वृषभ करपते, मयूर सायंकार, समीर मलनस, सुरेश गोहणे, बबन गुरनुले, योगेश मोहुर्ले, बाबूराव शेंडे यांनी सहकार्य केले.
ओ.बी.सी. जनमोर्चाची पांढरकवडा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:45 AM