शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
3
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
4
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
5
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
6
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
7
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
8
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
9
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
10
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
11
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
13
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
14
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
15
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
16
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
17
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
18
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
19
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
20
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

पीक कर्जाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेला जड

By admin | Published: March 21, 2016 2:12 AM

आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र

यवतमाळ : आगामी खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा बँक असमर्थ असून तसे पत्र बँकेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. बँकेची वसुली नसल्याने ७१९ कोटी ७७ लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांना वितरित करणे अशक्य असल्याचे या पत्रात म्हटले आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी इतर बँकांकडे धाव घ्यावी लागणार आहे.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत कर्ज वाटपासंदर्भात बँकर्स कमिटीची बैठक बुधवार १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकराी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खरीप हंगामात १ हजार ७९० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला देण्यात आले. यात सर्वाधिक कर्ज वाटपाची जबाबदारी यंदा राष्ट्रीयकृत बँकांवर सोपविण्यात आली. त्या खालोखाल जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले. यंदा ७१९ कोटी ७७ लाख रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले. परंतु या बँकेने आत्ताच हात वर केले आहे. कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे.जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून दुष्काळ पडत आहे. अशा स्थितीत गतवर्षी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यानंतर शेतकरी कर्जास पात्र ठरले होते. यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून यवतमाळ जिल्ह्याला बाद केले आहे. परिणामी कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांजवळ एक छदामही नाही. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्हा बँकेची कर्ज वसुली झाली नाही. कर्ज वसुली नसल्याने जिल्हा बँकेची परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे म्हटले आहे. गत वर्षी ११ हजार ३७८ शेतकऱ्यांनी ७० कोटी १५ लाख रुपयांची परतफेड केली. इतर शेतकरी कर्ज भरू शकले नाही. त्यामुळे आम्ही कर्ज वाटपास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्य बँक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला अतिरिक्त पैसा द्यायला तयार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचणी येत आहे. जिल्हा बँकेने पाठविलेल्या या पत्रावर विचार करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधकांना करण्यात आली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाचे धोरण ठरणार आहे. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा बँकांचे उंबरठे झिजवावे लागेल. (शहर वार्ताहर )४जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ७१९ कोटी ७७ लाखांऐवजी ३७५ कोटी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट करावे असे या पत्रात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या बँकेनेच उद्दीष्ट निम्मे करण्याची मागणी केली तर राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना काय कर्ज देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन सभासदांना कर्ज मिळणार नाही४जुन्या सभासदांनी कर्जाची परतफेड केली नाही, त्यामुळे बँक आर्थिक अडचणीत आली आहे. अशा स्थितीन नवीन सभासदांना कर्ज द्यायचे कोठून असा प्रश्न जिल्हा बँकेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीही नवीन सभासदांना जिल्हा बँकेकडून एक छदामही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.