पुसद (यवतमाळ) - एका व्हाट्सअप ग्रुप वर सीएए एनआरसी क्या समर्थनार्थ आज पुसद मध्ये मोर्चा निघणार होता. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप वर विविध प्रकारचे मेसेज तयार करून मुक मोर्चात सामील होण्याचे आव्हान सुद्धा केल्या जात होते. अश्यातच एक मेसेज एका विशिष्ट समाजाच्या विरोधात व्हाट्सअप ग्रुप वर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर लगेच संख्येने 8 वाजून 30 मी.ने शहर पोलीस स्टेशन गाठून पोस्ट टाकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असता रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केले आहे.
शहर पोलीस स्टेशन मे दिलेल्या माहितीवरून बालाजी चिंतावार (वय 35 वर्षे राहणार पुसद) असे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मोहम्मद जिंदरान मोहम्मद अकिल रा. गढीवार्ड असे तक्रार करण्याची नाव आहे. तक्रारकर्त्या मोहम्मद जिंदरान हा सायंकाळी चार वाजून 36 मिनिटांनी व्हाट्सअप ग्रुपचे करीत असताना एका ग्रुपवर मोबाईल द्वारे काढण्यात आलेल्या स्क्रींशोट पोस्ट केला पोस्टमध्ये एका समाजाबद्दल व समाजातील लोकांबद्दल आक्षेपहार्य लिखाण केले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने तात्काळ त्याच्या जवळील लोकांना माहिती दिली त्यानंतर सामाजिक भावना दुखावणारे पोस्ट कोणी टाकली याचा शोध घेतला असता ती बालाजी चिंतावार यांनी पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहर पोलीस स्टेशन गाठून मोहम्मद जिंदरान व समाजातील शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार दिली. सोबतच पोस्ट टाकणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा केली होती. त्यामुळे परिसरात व आंबेडकर चौक ते गांधी चौक परिसरातील दुकाने काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. पोस्ट टाकणार यांना पोलिसांनी तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यामुळे वातावरण शांत झाले. याबाबत बालाजी चींतावर विरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.