उमरखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाने आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर पोस्ट केले. याप्रकरणी जनभावना दुखावल्याबद्दल जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सूर्यवंशी यांनी १३ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फेसबुकवर प्रसारित केले. यामुळे जनभावना दुखावल्याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत मैड यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुणवंत सूर्यवंशीविरूद्ध भादंवि कलम २९५, ५०१ तसेच आय टी अॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अनिल किनगे करीत आहे.