ऑनलाईन लोकमततळणी : कुऱ्हा (तळणी) येथील अमोल मातकर हा जवान देशसेवा करताना २२ मार्च २०१२ रोजी शहीद झाला होता. त्यांच्या सहाव्या शहीद दिनानिमित्त त्यांना गुरूवारी कुऱ्हा-तळणी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी शहीद अमोल मातकर यांची वीरपत्नी प्रांजली मातकर, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी गावकऱ्यांतर्फे डॉ. जुवार, विनायक ठाकरे, शिक्षक भगत आदींनी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी शहीदांच्या बलीदानाचा विसर पडू देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.गावात मातकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले. मात्र एकही लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला सरपंच रेखा बोटरे, माजी सैनिक दादाराव बोटरे, ज्ञानेश्वर मातकर, तलाठी विलास सोनुने, पोलीस पाटील उमेश देशमुख, उमेश आडे, चिंतामण चहांदे, संजय देशमुख, भावराव राठोड, प्रवीण भाकरे, नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन सुरजुसे यांनी केले.
कुऱ्हा येथे शहिदाला श्रद्धांजली अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:34 AM