लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४३ गावे सहभागी झाली. सर्व गावांमध्ये श्रमदानातून गावे पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता गटविकास अधिकाऱ्यांनी आधी श्रमदान नंतरच कार्यालयीन कामकाज सुरू गेल्याने ग्रामस्थांमध्ये हुरूप निर्माण झाला.प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, गावकरी आपल्या गावाला बक्षीस कसे मिळेल, हा प्रयत्न करताना दिसत आहे. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी तर कर्मचाऱ्यांचे श्रमदानाचे वेळापत्रकच तयार केले. सकाळी ६.३० ते १० पर्यंत श्रमदान व नंतर कार्यालयीन कामकाज, असा शिरस्ता त्यांनी पाडला आहे. प्रत्येक विभागाचे कर्मचारी वेळापत्रकानुसार गावात जाऊन श्रमदान करतात. बीडीओ खेडकर स्वत: श्रमदान करून आदर्श निर्माण करीत आहे.बीईओ अनिल राऊत, कृषी विभागाचे राजेंद्र दुधे, शरद इरवे, दीपक कळमकर, रामेश्वर सर्वे, सचिन बोक्से, उत्तम राठोड, प्रवीण खडसे, दिनेश वाईकर, मोहन बाचलवार, अजय निंबाळकर, खान, अविनाश हिवरकर, केंद्रप्रमुख विठ्ठल माकोडे, रमेश माकोडे, आरोग्य विस्तार अधिकारी अशोक दुधाट, दिलीप ठाकरे, मिलींद चोपडे, विनायक मेश्राम, विजय खडतडे, सीमा कांबळे, सुरेखा कुमरे, ममता राऊत, रूपाली घुगे, रेश्मा मेनपवार, माधुरी होले आदी कर्मचारी कार्यालयीन कामे सांभाळून महाश्रमदानात खारीचा वाटा उचलत आहे.
श्रमदानानंतर कार्यालयीन कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:29 PM
पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातील ४३ गावे सहभागी झाली. सर्व गावांमध्ये श्रमदानातून गावे पाणीदार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता गटविकास अधिकाऱ्यांनी आधी श्रमदान नंतरच कार्यालयीन कामकाज सुरू गेल्याने ग्रामस्थांमध्ये हुरूप निर्माण झाला.
ठळक मुद्देबीडीओंचा पुढाकार : राळेगाव तालुक्यात जलचळवळ