शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

By admin | Published: April 16, 2016 1:58 AM

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन

सामाजिक न्याय विभाग : बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रक्तदानयवतमाळ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.शासनाने बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याच्या निर्णय घेतला. त्यानिमित्त १४ एप्रिलपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात असून त्यातंर्गत सामाजिक न्याय भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती लता खांदवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश शहापूरकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, समाजकल्याण अधिकारी जया राऊत, विशेष अधिकारी पियुष चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कलशेट्टी यांनी स्वत: रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. दिवसभर चाललेल्या या शिबिरात अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. त्यात जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कणेर्वार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. दरबस्तेवार, पोलिस उपनिरीक्षक अनुप वाकडे यांच्यासह समाजकल्याणच्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.यावेळी रक्तसंकलनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची चमू उपस्थित होती. रक्तदान करणाऱ्यांना रक्त संक्रमण परिषदेच्यावतीने सभापती लता खांदवे, डॉ. कलशेट्टी व उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)