लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते.प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी अनुप खांदे, संदीप महाजन, विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजचे प्रमुख महेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनात महत्वाचा अंग मानला जातो. असे असले तरी, इतर विभागाचासुध्दा प्रशासनात महत्वाचा सहभाग आहे. सर्व विभागाच्या समन्वयातूनच चांगले काम होऊ शकते. आपल्याकडे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांशी आपण सौहार्दाने वागलो तर त्याला मिळणारा आनंद त्याच्या मनात चिरकाल टिकतो. त्यामुळे प्रशासनाबद्दल नागरिकांच्या मनात जिव्हाळा निर्माण होईल, या पध्दतीने काम करणे गरजेचे आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी चंद्रकात जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ, महेंद्र दर्डा यांनीही विचार मांडले. तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजच्यावतीने अंकिता प्रधान, प्रिया करताडे आदी विद्यार्र्थ्याना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने पाणी फाऊंडेशमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रामाजी टेकाम, तलाठी संतोष चव्हाण, कृषी सहायक शंकर गिरगावकर, ग्रामविकास दूत आश्विनी बांबल, पोलीस पाटील विकास बोरकर यांचा, जलयुक्त शिवारमध्ये कार्य करणारे कृषी अधिकारी ए.आर. पिंपरखेडे, मागेल त्याला शेततळेमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे कृषी सहायक सुभाष राठोड, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत विकासगंगा सामाजिक संस्था तसेच महसूल विभागांतर्गत डिजीटायझेशनमध्ये उत्कृष्ट कार्य करणाºया सोनल झोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, कोतवाल एस.एस. मुंजाळ, पोलीस पाटील पी.बी. कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, नितीन हिंगोले यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन व आभार नंदकुमार बुटे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 10:11 PM
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांचा गुणगौरव आणि विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजतर्फे मोफत पुस्तके वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख होते.
ठळक मुद्देकौतुकाची थाप : विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रीजतर्फे महसूल दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप