लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे.तालुक्यात १५ तासांत तालुक्यात तब्बल १२१.४२ मिमी पाऊस झाला. १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी २९.४२ मिमी, तर गुरूवारी तब्बल ९२ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०५ मिमी आहे. सध्या एकूण ६५९.८६ मिमी पाऊस पडला. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास आकडा पोहोचला. पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. वरून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे सर्व पाणी शेतात जमा झाल्याने पिकांचे नुकसान झाले.यावर्षी तालुक्यात ३३ हजार ४00 हेक्टरवर कापूस, २२ हजार ३00 हेक्टरवर सोयाबीन, आठ हजार ५00 हेक्टरवर तूर, ४०९ हेक्टरवर मूग, ३६५ हेक्टरवर उडीद यासह फळबाग व इतर पिकांची लागवड झाली. या सर्वच क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हरू, रामगाव (रामेश्वर), दत्तापूर, अंतरगाव, धामणगाव, महातोली, दयार्पूर यासह काही गावातील १00 पेक्षा जास्त घरांची पडझड झाली. हातनी, भांडेगाव, हातोला, जवळा, हरू येथे पुरात बैल, दोन म्हशी, दोन गाय, सहा शेळ्या, यासह काही ठिकाणी जनावरे वाहून गेली. कोहळा येथे झाड कोसळल्याने एका गायीचा मृत्यू झाला. अनेक गावांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.नुकसानीचे सर्वेक्षण सुरूपावसामुळे तालुक्यात १४ घरे पूर्णत: बाधीत झाली. १३७२ घरांची पडझड झाली. यामुळे २४८ कुटुंबे पूर्णपणे बाधीत झाली आही. याशिवाय तालुक्यात १९४ जनावरे दगावली आहे. प्रशासनाने नुकसानीच्या सवेक्षर्णाच्या सूचना दिल्या. गुरूवारी रात्री उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार अरुण शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे, नायब तहसीलदार एस.जे. सरागे व एस.एम. होटे यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी नुकसानग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. शुक्रवारी पडझड घरांच्या सर्वेक्षणासाठी तलाठी, ग्रामसेवक व शाखा अभियंता, तर शेती पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाकरिता ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांचे पथक तयार करून सर्वेक्षणाला सुरूवात झाली.अडाणचे पाच दरवाजे उघडलेदारव्हा तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेला म्हसनी येथील अडाण प्रकल्प ९० टक्के भरला. या प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आला. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कुंभारकिन्ही, अंतरगाव यासह सर्वच प्रकल्पाने पूर्ण पातळी गाठली आहे.
दारव्हा तालुक्यात पुराने हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:38 PM
तालुक्यात अतिवृष्टीमुळे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक आंदाज आहे. तालुक्यात तब्बल १९४ जनावरे दगावली असून १३७२ घरांची पडझड झाली आहे. पुरामुळे २४८ कुटुंबे बाधीत झाली आहे.
ठळक मुद्दे१९४ जनावरे दगावली : १३७२ घरांची पडझड, ६५ हजार हेक्टरवरील पिके बाधित