लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर ओबीसी परीषदेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.सन १९३१ पासून ओबीसी समाजाची जणगणना न झाल्याने ओबीसी समाजाच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजासाठी केंद्रात व राज्यात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी परीषदेचे प्रवीण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, अखिल सातोकर, अमोल टोंगे, सिद्धीक रंगरेज, संतोष ढुमने, राजेश पहापळे दिलीप भोयर, विनोद बोबडे, दशरथ पाटील, देवराव धांडे, यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते. दरम्यान विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी आंदोलन मंडपाला भेट देऊन ओबीसी समाजाच्या विकासाच्या संदर्भात या समाजाचा मुद्दा विधान परीषदेत प्रामुख्याने घेण्याचे आश्वासन दिले.
ओबीसी परिषदेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:51 PM
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर ओबीसी परीषदेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देतहसील कार्यालयासमोर ओबीसी परीषदेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन