उमरखेड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी लोकवर्गणीतून निर्माण झालेल्या सुमेध बोधी विहाराला भेट दिली. त्यांनी तेथील कार्य पाहून विहाराच्या विकासकामासाठी एक कोटींचा निधी देण्याची घोषणा केली.
विहारात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विहार समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नामदेव ससाने, माजी आमदार विजय खडसे, पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, रिपाइचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, धम्मानंद नरवाडे, विरेंद्र खंदारे, राहुल काळबांडे उपस्थित होते. प्रथम भदन्त डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी उपस्थितांना पंचशीलसह त्रिशरण प्रदान केले. रामदास आठवले यांनी विहारात अभ्यासिका, वाचनालय, विपश्यना ध्यान केंद्र यासाठी एक कोटी खर्च केले जातील, असे सांगितले. संचालन प्रा. गजानन दामोधर, तर आभार संतोष नितळे यांनी मानले. यावेळी विहार समितीचे सचिव भीमराव सोनुले, उत्तम शिंगणकर, सुभाष वाठोरे, साहेबराव कांबळे आदी उपस्थित होते.