शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

लोकसहभागातून एक कोटी

By admin | Published: August 15, 2016 1:19 AM

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक

बळीराजा चेतना अभियान : नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत रूपेश उत्तरवार यवतमाळ आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक कोटी रूपयांची मदत बळीराजा चेतना अभियानात गोळा झाली आहे. जिल्हा प्रशासनाने हा निधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वळता केला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या बाबीसाठीही शेतकरी कुटुंबाला मदत मिळणार आहे. यासोबतच कॅन्सरसारख्या दुर्धर आजार आणि शिक्षणासाठी ही मदत दिली जात आहे. आर्थिक विवंचनेने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात शासनच नव्हेतर लोकसहभागातूनही निधी मिळत आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाने तितक्याच पारदर्शकतेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे. कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांना या अभियानातून १० हजार रूपयांचा निधी दिला जात आहे. आतापर्यंत ३६ शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली. यासोबतच संकटावर मात करण्यासाठी ४२ नवीन प्रस्ताव पुढे आले आहेत. एमबीबीएस अथवा अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता आर्थिक अडसर निर्माण होताच प्रत्येक विद्यार्थ्याला ३० हजारा याप्रमाणे आठ कुटुंबांना ही मदत वितरित करण्यात आली. वीजतारांच्या स्पर्शाने अथवा विहिरीत पडून जनावराचा नैसर्गिक मृत्यू झाला, फुटवे खावून जनावरे मेली, तर अशा प्रकरणात शासनाकडून कुठलीही मदत शेतकरी कुटुंबाला मिळत नाही. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून प्रत्येकी १० हजाराप्रमाणे मदत देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लोकसहभागातून मिळालेल्या रकमेपैकी आतापर्यंत ६५ लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत प्री-परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना पाच हजार रूपयांची मदत दिली जात आहे. यातून विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करता येणार आहे. या योजनेसाठी शेकतऱ्यांची अनेक मुले पुढे आली आहेत. या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हा मुख्य उद्देश आहे.