शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

हद्दवाढीसाठी एक कोटीची तरतूद

By admin | Published: February 27, 2015 1:40 AM

नगरपरिषदेने मंजूर केलेल्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शहराच्या हद्दवाढीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे.

यवतमाळ : नगरपरिषदेने मंजूर केलेल्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शहराच्या हद्दवाढीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. यावरून येत्या काही दिवसात शहराच्या हद्दवाढीचे संकेत मिळत आहेत. याशिवाय अर्थसंकल्पात शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी एक कोटी ४० लाख, नाट्यगृहासाठी दोन कोटींची तरतूद केलेली आहे. शासकीय अनुदानासह २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकात १०३ कोटी २२ लक्ष रुपये दर्शविले आहे. तर खर्चावर ६९ कोटी ७० लक्षाची तरतूद करण्यात आली आहे. त्यात निधीसह ३३ कोटी ५१ लाख रुपये शिल्लकी असल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषदेत दिली. या अर्थसंकल्पात शिलकीमध्ये २८ कोटी ३४ लाखाचा शासकीय निधी तर नगरपरिषदेची महसुली शिल्लक दोन कोटी १० लाख रुपये आहे. नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या गृहकर वसुलीतून सहा लक्ष रुपये, वृक्षकरातून नऊ लक्ष रुपये, जाहिरात, शोटॅक्स या करातून पाच लक्ष रुपये असे सहा कोटी १४ लक्ष रुपयांचे उत्पन्न आहे. याशिवाय नगरपरिषद दुकान भाड्यातून ६८ लाख, आठवडी बाजार व दैनिक बाजार वसुलीतून ५३ लाख, इमारत परवानातून दोन लाख, गुंठेवारी विकास शुल्क पाच लाख, प्रीमीयम शुल्क ५० लाख याशिवाय निरनिराळ््या शुल्कातून दोन लाख रुपये उत्पन्न असे एक कोटी ८० लाख रुपये नगरपरिषदेला मिळत आहे. याशिवाय शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून २२ कोटी ३४ लाख इतर संकीर्ण उत्पन्नातून दोन कोटी नऊ लाख भांडवली कामाकरिता मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून २१ कोटी नऊ लाख, ऋण व निलंबण लेखा यापासून १० कोटी ३२ लाख शिल्लकेसह जमा आहेत. सामान्य प्रशासन व वसुली खर्चावर नऊ कोटी ५० लाख, सार्वजनिक सुरक्षिततेवर सहा कोटी २९ लाख, आरोग्य व सुविधेवर १६ कोटी १५ लाख यासह असा एकूण ३५ कोटी ८७ लाख महसुली खर्च अपेक्षित आहे. २६ प्रकारच्या भांडवली व विकास कामावरील खर्चासाठी ३२ कोटी ३० लाखाची तरतूद केली आहे. असाधारण खर्चासाठी एक कोटी ५३ लक्ष रुपयांची तरतूद आहे. असा एकंदर ६९ कोटी ७० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये नाविण्यपूर्ण कामांचाही समावेश केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण ३० लाख रुपये, पुतळा परिसर रंगकामे, तैलचित्र रंगकाम, स्थलांतर यावर १० लाख रुपये, कुंपणे व मालमत्ता उभारणीवर २५ लाख रुपये, बगीचा बांधकाम देखरेखीसाठी २५ लाख, नऊ कोटी ६८ लाख आस्थापना खर्च, स्ट्रिट लाईट बिलावर एक कोटी ५५ लाख, नवीन पथदिवे व विद्युत पोल स्थानांतरणासाठी एक कोटी, पाणी बीलासाठी एक कोटी २० लाख, विहिर दुरूस्ती पाच लाख अशा ६३ छोट्यामोठ्या कामांसाठी तरतूदी करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय व मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी पत्रपरिषदेत दिली. (कार्यालय प्रतिनिधी)