लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या यवतमाळ मंडळ कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील १३ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिलपासून ग्रामस्वराज्य अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाची सुरूवात बाभूळगाव तालुक्यातील डेहणी येथे झाली. मधूकर देवाजी मेश्राम यांना अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे व कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे यांच्या हस्ते वीज जोडणी देऊन सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच राहुल मेश्राम, पोलीस पाटील दत्ताजी राऊत, माजी सरपंच वसंत राऊत, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महावितरण ग्रामस्वराज्य अभियानात जिल्ह्यातील १३ गावांमध्ये शंभर टक्के विद्युतीकरण करण्यासाठी गावनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत.१४ एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान महावितरणच्या वतीने या १३ मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बाभूळगाव तालुक्यातील डेहणी, कळंबच्या शेराड, नेरमधील वटफळी, पुसद तालुक्यातील वालतुर, हुडी (बु), पांडुर्णा (बु), देवठाणा, जवळा, दगड धानोरा, हिवळणी आणि उमरखेड तालुक्यातील मन्याळी, करंजी, सावळेश्वर गावांचा समावेश आहे. ज्या गावामध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावांचा या योजनेत समावेश आहे. महावितरणच्या मेळाव्यात उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता रामेश्वर माहुरे यांनी केले.
‘ग्रामस्वराज्य’त शंभर टक्के विद्युतीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:22 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या यवतमाळ मंडळ कार्यालयाच्यावतीने प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेतून जिल्ह्यातील १३ गावांत १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे१३ गावांचा समावेश : डेहणी येथून ग्रामस्वराज्य अभियानाला सुरूवात