शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

पूस धरणात एक टक्काच साठा

By admin | Published: May 29, 2016 2:33 AM

पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे.

पाण्याचा अपव्यय टाळा : १ जूनपासून पुसदकरांना चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा पुसद : पूस धरणाची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवनामुळे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला धरणातून सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा सहजपणे होऊ शकतो. एवढा जलसाठा पूस धरणात आहे. असे नगर पालिकेकडून संकेत देण्यात येत होते. मात्र एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तसेच धरणातून होणाऱ्या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. आज पूस धरणाचा जलसाठा केवळ एक टक्का आहे. पाणी पातळीतील ही प्रचंड घट चिंतेची बाब आहे. १ जूनपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी सांगितले. महिनाभरापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आता जलसाठा नाममात्र उरल्यामुळे पाणीपुरवठ्याचा कालावधी पाच दिवसापर्यंत वाढविण्यात येणार आहे. १ जूनपासून पुसद शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून २० जूनपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी पावसाने हजेरी लावली तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊ शकेल. पूस धरणात एक टक्काच जलसाठा आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी कले आहे. नदीपात्रही कोरडेठाकमे महिना संपत असला तरी पुसदवासी प्रचंड उकाड्याने हैरान झाले आहे. दिवसेंदिवस उन्हाळ््याची तीव्रता वाढतच आहे. पूर्वी पूस नदीला भरपूर पाणी असल्याने मुले उन्हाळी सुटीमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. मात्र यावर्षी पूस नदीचे पात्रही प्रचंड तापमानामुळे कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मुले पोहण्याऐवजी केवळ व्हिडीओ गेम आणि मोबाईल गेममध्येच गुरफटून गेले आहेत. पूस नदी कोरडी पडल्याने उत्साही मुलांचा पुरता हिरमोड झालेला आहे. त्यातत विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाने चिमुकल्यांसाठी उन्हाळी सुटी एक प्रकारे त्रासदायकच ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी) सिंचन विभाग जबाबदार त्यातच अघोषित भारनियमनामुळे शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. १५ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनही वाढले आहे. मार्च महिन्यापर्यंत पूस धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी झाली. हजारो मोटारपंपाच्या माध्यमातून धरणातून पाण्याचा उपसा सुरू होता. जलसाठा स६ा टक्के उरला त्यावेळीही पाणी उपसा करण्यावर सिंचन विभागाने फार उशिरा धडक पावले उचलली. तसेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात सिंचन विभागाने निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस कॅनॉलद्वारे पाणी सोडले, त्यामुळे धरणाचा जलसाठा कमी झाला आहे. सध्या पुसदकरांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. याला सिंचन विभागाचे अधिकारी पूर्णत: जबाबदार असल्याचे शहरवासीयांचे म्हणणे आहे.