संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : १४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. हे औषध केवळ ४८ तास सुरक्षित राहू शकते. या औषधाचा हवेशी संबंध येताच, ते निरूपयोगी ठरते, असे सांगण्यात आले.हे औषध केवळ प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. ते खुल्या बाजारात उपलब्ध होत नाही. आणीबाणीच्या प्रसंगीच हे औषध वनविभागाला उपलब्ध करून दिले जाते. या औषधाचे तापमान कायम ठेवल्यासच ते सुरक्षित राहते. मात्र मोहिमेदरम्यान जंगलात तापमान मेंटेन होत नसल्याने २४ तासानंतर गनमधील औषध काढून फेकून द्यावे लागते. गेल्या १५ दिवसांपासून राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीच्या शोधासाठी मोठा तैनात करण्यात आला आहे. राळेगाव, कळंब व पांढरकवडा या तालुक्यात या वाघिणीचा वावर असून तिच्यासोबत तिचे दोन बछडे व एक वाघ आहे. सखीचे जंगला म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बेशुद्ध करून सुरक्षित जागी न्यावे अथवा ते शक्य नसेल, तर ठार मारावे, असे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी भलामोठा ताफा जंगलात तैनात केला आहे. या ताफ्यात अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये हे पूर्णवेळ हजर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही मोहिम सुरू आहे. या मोहिमेवरील रोजचा खर्च एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.मोहिमेत सहभागी डॉक्टरांवरील दररोजचा खर्च १० हजार आहे. ट्रॅन्क्युलायजर (बेशुद्ध करण्याचे औषध) चा खर्च २२ हजारांचा आहे. हत्ती व त्यासोबतच्या ताफ्याचा खर्च १० हजार, पोलीस १० हजार, पेट्रोल-डिझेल १० हजार, ड्रोन कॅमेरे ४ हजार, मजूर ३० हजार, अधिकारी व कर्मचाºयांच्या राहण्याचा खर्च १० हजार, असा एकुण या मोहिमेसाठी एक लाख रूपये दररोज खर्च केल्या जात असल्याचे सांगितले जाते.लोकप्रतिनिधींची अनास्था कायमनरभक्षी वाघिणीने १४ लोकांचे बळी घेतल्यानंतर राळेगाव, कळंब व पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घडणाºया घटना लक्षात घेता, माजीमंत्री प्रा.वसंत पुरके व राळेगावचे आमदार प्रा.अशोक उईके यांनी पुढाकार घेऊन वाघिणीच्या बंदोबस्ताचा मुद्दा रेटून धरला. मात्र आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार प्रा.राजू तोडसाम हे मात्र या विषयाच्या कायम दूर असल्याचे दिसून आले.
वाघिणीच्या बेशुद्धीची एक गोळी तब्बल २२ हजारांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:18 PM
१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.
ठळक मुद्दे२४ तासानंतर होते निकामी : फौजेचा दरदिवसाचा खर्च एक लाख