लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील नियोजनशून्य विकास कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. यातच भूमिगत गटार योजनेच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव भाजपा सदस्यांनी बहुमताच्या जोरावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. तर सभेत प्रशासनाची बाजू मांडण्यासाठी कोणीच नसल्याने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्ष नगरसेवकांनी सभागृहातून वॉकआऊट करत बहिष्कार टाकला.नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार याचे संकेत पूर्वीच लोकमतने दिले होते. त्याप्रमाणे घनकचऱ्याच्या मुद्यावरून नगरपरिषदेपुढे नगरसेवकांनी आंदोलन केले. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. मात्र मुख्याधिकारी अनिल अढागळे गैरहजर होते. १९७ कोटींच्या भूमिगत गटारी योजनेच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाने पालिकेपुढे ठेवला. यामध्येही ७.४७ टक्के अधिक दराची निविदा मंजुरीस आली. शिवाय १० टक्के लोकवर्गणी पालिकेला द्यावी लागणार आहे. यापूर्वी नगरपरिषदेने लोकवर्गणी दिल्याने डबघाईस आली आहे. पालिकेची नेमकी आर्थिक स्थिती काय हे सांगण्यासाठी मुख्याधिकारीच सभागृहात नसल्याने विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्ष सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकत वॉकआऊट केले.त्यानंतर नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत सभेचे कामकाज सुरू झाले. यावेळी भूमिगत गटारी योजनेच्या निर्णयाबाबत नगराध्यक्षांनी हा निर्णय गंभीरपणे व योग्य शहानिशा करून घेण्यात यावा, प्राधिकरणाकडून योजनेबाबत कुठल्याही तांत्रिक बाबींचा खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे अमृतमधील नळयोजनेसारखी स्थिती निर्माण होवून समस्या वाढतील, याचा विचार करून निर्णय घेतला जावा, असे मत नोंदविले. त्यानंतर सत्ताधारी भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी भूमिगत गटार योजनेची निविदा मंजूर करण्यात यावी, असा ठराव बहुमताने घेतला.संविधान चौक, छत्रपती मार्गाचा प्रस्ताव मंजूरबैठकीत बसस्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकाला संविधान चौक नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. याशिवाय छत्रपती चौक नामकरणाच्या प्रस्तावात सुधारणा सुचवून रस्त्याला छत्रपती नाव देण्याचे ठरविण्यात आले तर अग्रसेन चौक नाव देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या चौकाला पूर्वीच भगवानबाबा नाव देण्यात आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. तसे लेखी निवेदन नगराध्यक्षांपुढे सभागृहात सादर केले. या व्यतिरिक्त विषयपत्रिकेतील सर्व विषय मंजूर केले.
भूमिगत गटार योजनेच्या निविदा एकतर्फी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:28 PM
शहरातील नियोजनशून्य विकास कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. यातच भूमिगत गटार योजनेच्या निविदा मंजुरीचा प्रस्ताव भाजपा सदस्यांनी बहुमताच्या जोरावर मंगळवारी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला.
ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष नगरसेवकांचा बहिष्कार