शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

एक बात बतानी हैं आनेवाली नसलो को...

By admin | Published: May 03, 2017 12:06 AM

एका मुस्लीम युवकाला वाटले, आपल्या लग्नाची शहनाई म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बिगुल ठरावा.

मार्मिक लग्न पत्रिका : शेतकरी, सैन्य, पाणी, बेटी बचाओ, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अविनाश साबापुरे ल्ल यवतमाळ छोटासा एक देस पडोसी औकात को अपनी भुल गया उसकी अकड को जड से मिटाकर पिछला पाठ पढा देना... बस एक बात बतानी हैं आनेवाली नसलो को अपनी रक्षा जो करते हैं उनकी शान बढा देना... ही कविता नव्हे, लग्नाच्या पत्रिकेवरचा मजकूर होय. एका मुस्लीम युवकाला वाटले, आपल्या लग्नाची शहनाई म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा बिगुल ठरावा. त्याने दोन हजार पत्रिका वाटल्या अन् पत्रिका पाहणाऱ्या प्रत्येकाने ‘रिटर्न कॉल’ करून त्याच्या देशभक्तीला सलाम केला. ५ मे रोजी घाटंजीत होऊ घातलेल्या या लग्नाची पत्रिका म्हणजे उदात्त, उत्तम, महन्मंगल देश घडविण्याची दवंडीच. अन् ही दवंडी थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या कानांपर्यंत पोहोचली, हे विशेष! घाटंजी येथील मेहवीश फातीमा आसमा परवीन या तरुणीचे लग्न वाईबाजार (ता. माहूर) येथील शेख मोहसीन शेख आमीन या युवकाशी होत आहे. तेही बिनहुंड्याने. सरकारी नोकरीत असलेला शेख मोहसीन माहुर, किनवटमध्ये मागासवर्गीयांच्या विकासाकरिता धडपडतो. त्याने छापलेली लग्नाची पत्रिका म्हणजे दहा पानांची पुस्तिकाच आहे. पहिल्याच पानावर ‘वतन के रखवाले’ असे शीर्षक. लगेच सैनिकांच्या शौर्याला नमन करणारी कविता. पत्रिकेवरील हा मजकूर पाहताच लक्षात येते, हे लग्नाचे नुसते आवतन नव्हे; देशसेवेचे आवाहन होय! हिंदूइझम, जैनिझम, बुद्धीझम, इस्लाम, ख्रिश्चनिटी हे इंग्रजी शब्द अशा पद्धतीने छापण्यात आले आहेत, की ते वाचताना ‘इंडियन’ हा ठळक आणि एकमेव शब्द नजरेत भरतो. या पत्रिकेचे एक पान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’साठी दिले आहे. महात्मा गांधींच्या चष्म्याचा लोगो घेऊन स्वच्छ भारत मिशनचा आग्रहदेखील धरला आहे. डोईवर हात ठेवून आकाशाकडे बघणाऱ्या शेतकरी दाम्पत्याचे चित्र हे या पत्रिकेतील ‘करुण’ पान. ‘शेतावर कर्ज आहे हा छोटा आहे रे आजार, पण तू आत्महत्या केली ना बापू तुझं घर होईल रे बेजार’ या दोन ओळीही हृदयाला पाझर फोडतात. किनवट, माहूर, उमरखेडचे सहस्त्रकुंड अशा वृक्षराजींनी संपन्न मुलुखात काम करणाऱ्या शेख मोहसीनने ‘इन्ही दरख्तो से कायम वजूद हैं अपना’ म्हणत वृक्षप्रेमासाठी लग्नपत्रिकेचे एक पान वाहिले आहे. ‘हर शराबी को मैने नामुराद होते देखा हैं, नशे मे घरो को बरबाद होते देखा हैं’ अशा ओळींसह ‘संभल शराबी’ या शीर्षकाचे एक पान लक्षवेधी आहे. सामाजिक संदेश देता देता शेख मोहसीनने शेवटचे पान पुन्हा देशवासीयांना अर्पण केले. ते असे... सज्जनाने वाचावी पोथी पुराणे नेमकी आपण रंजल्यांचे दु:ख वाचूया, तोडगा वादावरी वेडा तुम्हा हा सांगतो मंदिरी रब अन् मशिदी राम ठेवूया. अमित शहांकडून लग्नपत्रिकेची दखल सामाजिक कार्यासाठी मी दोन वर्षांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देईल, असे सांगतच शेख मोहसीनने लग्न जुळविले. हुंडा न घेता होणाऱ्या लग्नाच्या स्वागत समारंभाचे ‘डेकोरेशन’ फक्त सामाजिक संदेशांच्या फलकांनीच सजणार आहे. अण्णा हजारे, पोपटराव पवार यांना आदर्श मानणाऱ्या शेख मोहसीनने आपल्या लग्नाच्या पत्रिका थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, गुलामनबी आझाद, मेहबुबा मुफ्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह राज्याचे संपूर्ण मंत्रालय, डॉ. प्रकाश आमटे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे अशा दिग्गजांना पाठविल्या आहेत. दोन हजार पत्रिका वाटल्यावर साधारण हजारेक लोकांनी फोन करून पत्रिकेला ‘फुल मार्क’ दिले. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यालयातून लगेच फोन आला, ‘अमित शाह आणि त्यांच्या टीमकडून लग्नाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा संदेश प्राप्त होईल.’ ही पत्रिका, त्यासाठीचा मजकूर तयार करण्यासाठी तीन महिन्यांपासून माझे काम सुरू होते. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या भावना पोहोचविण्याचा उद्देश होता. आता येणारे रिप्लाय बघता, समाधान वाटते. - शेख मोहसीन शेख आमीन, नवरदेव