शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

आॅनलाईन फसवणुकीतील पैसाही मिळतो परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:30 PM

चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे.

ठळक मुद्देयवतमाळ सायबर सेलचे यश : दहा गुन्ह्यांमधील रकमेचा परतावा, मात्र २४ तासात तक्रार नोंदविणे आवश्यक

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे. यवतमाळच्या सायबर सेलने अशा एक नव्हे तर तब्बल दहा प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींना रोख रकमेचा परतावा दिला आहे.आॅनलाईन शॉपिंग अ‍ॅप आणि इतरही वेबसाईटवरून आॅनलाईन खरेदी केली जाते. अनेकदा या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक केली जाते. फोन कॉल करून कस्टमर केअरमधून बोलतो अशी बतावणी करून डिलेव्हरीबाबत विचारणा करीत ग्राहकांकडून त्याचा एटीएमचा क्रमांक व ओटीपी विचारण्यात येतो. त्यानंतर संबंधित व्यक्ती थेट बँक खात्यातूून घसघशीत रक्कम काढून घेतो. या पध्दतीने अनेकांची फसवणूक झाली आहे. प्रतिभा कृष्णराव पवार रा. व्यकंटेशनगर यांनी २२५ रुपयांचे घड्याळ खरेदी केले होते. मात्र त्यांच्या बँक खात्यातून ३५ हजाराची रोकड पळविली, स्वाती रमेश भूत यांची आॅनलाईन सोने खरेदीत ५० हजाराने फसवणूक झाली. याचप्रमाणे इतरही दहा जणांना गंडा घातला गेला. या सर्वांनी घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. नंतर ठाण्यातून तक्रारीची पोच घेतलेला अर्ज थेट सायबर सेलमध्ये सादर केला. सायबर सेलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ग्राहकांच्या बँक खात्यातून व्हर्च्यूल व्हॅलेटमध्ये वळती झालेली रक्कम तत्काळ थांबविण्याची सूचना दिली. त्यामुळे आॅनलाईन व्यवहारातील रक्कम परत मिळविता आली. सायबर सेलकडे तक्रार अर्जाची पोच देताना बँकेतून पैसे वळते झाल्याचा एसएमएसचे स्क्रिन शॉट, एटीमएचे डिटीएल्स, बँक पासबुक आणि आधार कार्ड इतके कागदपत्र फसवणूक झालेल्या व्यक्तीने तत्काळ सादर केल्यास त्याला निश्चितच फायदा होऊ शकतो.अशी होते पैसे थांबविण्याची प्रक्रियादेशपातळीवरच्या बँका, आॅनलाईन खरेदी विक्री करणाºया कंपन्याचे नोडल अधिकारी, सायबर सेलमधील पोलीस अधिकारी - कर्मचारी यांचा ‘स्टॉप बॅकींग फ्रॉड’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रृप आहे. फसवणुकीची तक्रार येताच सायबर सेलेकडून व्हर्च्युल पॉकेटमध्ये जमा झालेल्या रकमेचे ट्राझिक्शन थांबविण्याचे निर्देश दिले जाते. त्यानंतर हा पैसा पुढे जात नाही. संबंधित कंपनीच्या खात्यात रक्कम जमा होत नाही. हा पैसा परत बोलविण्याची प्रक्रिया करून फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नुकसान थांबविता येते. ही कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे प्रमुख पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वात फौजदार श्रीकांत जिंदमवार, सुमित पाळेकर, दिगांबर पिलावन, पंकज गिरी, अजय निंबोळकर, प्रगती कांबळे, रोशनी जोगळेकर यांनी केली आहे.ग्राहकांची सतर्कता आणि सायबर सेलचे तांत्रिक कौशल्य यातून आॅनलाईन फसवणुकीचे गुन्हे सहज उघड करता येते.- श्रीकांत जिंदमवार,फौजदार, सायबर सेल.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम