लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अनेक प्रतिष्ठीत वस्त्यांमध्ये देहविक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा येथे रसपान करत असल्याने थेट कारवाई होताना दिसत नाही. परिसरातून एखादी तक्रार आल्यानंतरही त्याचा वेगळ््याच पद्धतीने फायदा घेतला जातो.अगदी दहा किलोमीटर परिघात वसलेल्या शहरातही आता महनगराचे पॅटर्न अवैध व्यवसायासाठी वापरले जात आहे. शहरातील, ग्रामीण भागातील मुलींना नादी लावण्याचे प्रकार जोरात सुरू आहे. पूर्वी दिवसाच काही लॉजमध्ये हा व्यवसाय चालत होता. आता याच्या कक्षा विस्तारल्या असून ठराविक असा कोणता ‘एरिया’ राहिलेला नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा राजरोसपणे वापर केला जात आहे. त्याचे तसे ग्रूप तयार झाले आहेत. अल्पवयीन मुलेही यामध्ये बळी पडत आहेत. जामनकरनगर परिसरातील अड्ड्यावर खात्यातील यंत्रणा विशेष मेहरबान आहे. येथून दोन अधिकारी ‘सेवा’ घेतात. गोदणी रोडवरच्या अड्ड्याची प्रमुख आठवडी बाजार परिसरातील टोळीशी कनेक्टेड आहे. आर्णी मार्गावर बायपासजवळ तर एका नामांकित हॉस्पिटलमागे देहविक्रीचे केंद्र आहे. दारव्हा मार्गावर दोन हॉटेलमागे या व्यवसायाने जोर पकडला आहे. तेथे गेलेल्या ग्राहकाशी वृद्ध किंवा मध्यवयीन महिला बोलणी करते. कोण उपलब्ध आहेत, त्याचे फोटो दाखवून डिलिंग केले जाते.मोहा फाटा परिसरात एका गुन्हेगारी टोळीतील गँगस्टरने गुंतवणूक केली आहे. येथे फ्लॅट भाड्याने घेऊन त्याने हा व्यवसाय सुरू केला आहे. एकंदर देहविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असून अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. खात्यातीलच काही कर्मचारी, अधिकारी येथे नियमित भेटी देत असल्याची चर्चा रंगत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिष्ठीतांच्या वस्त्यामध्ये असे प्रकार होतात. विशेष करून अर्पाटमेंट अथवा एका कडेला असलेल्या घराचा आसरा घेतला जातो. प्रतिष्ठीतांसाठी तर खास व्यवस्था करणारेसुद्धा सक्रीय झाले आहे. थेट नागपूरवरून आयात केली जाते. त्यामुळे यवतमाळचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे.पॉश वस्त्यांचा आडोसाबसल्या जागी पैसा कमावण्याचा मार्ग म्हणून अनेक जण आॅनलाईन देहविक्री व्यवसायात उतरले आहे. कुणाला संशय येऊ नये यासाठी या व्यवसायाचे अड्डे पॉश वस्त्यांमध्येच सुरू करण्यात आले आहे. दारव्हा रोड, आर्णी रोडवर हे अड्डे उघड-उघड सुरू आहे. या व्यवसायाची प्रशासनाला माहिती असली तरी प्रशासनातीलच अनेक प्रतिष्ठीत या धंद्यातील ‘सेवे’चे नियमित ‘लाभार्थी’ असल्याने कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. वाढत्या देहविक्रीच्या रॅकेटमुळे शहराच्या सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे. तर यंत्रणेतील काही घटक याला स्वार्थासाठी अप्रत्यक्षरित्या अभय देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
यवतमाळात पोफावला आॅनलाईन देहविक्रीचा धंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 10:16 PM
शहरातील अनेक प्रतिष्ठीत वस्त्यांमध्ये देहविक्रीचे अड्डे तयार झाले आहेत. यंत्रणेतील काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा येथे रसपान करत असल्याने थेट कारवाई होताना दिसत नाही. परिसरातून एखादी तक्रार आल्यानंतरही त्याचा वेगळ््याच पद्धतीने फायदा घेतला जातो.
ठळक मुद्देनागपूर पॅटर्नचा वापर : सोशल मीडियावरून ‘डिलिंग’