शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
3
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
4
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
5
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
6
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
7
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
8
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
9
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
10
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
11
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
12
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
14
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
15
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
16
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
17
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
18
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
19
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
20
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!

२४ तासांपूर्वीच स्वीकृतांची नावे द्यावी लागणार

By admin | Published: December 26, 2016 1:57 AM

नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार बहाल करण्याच्या

नगरपरिषद : पक्षाच्या संख्याबळानुसार नावे पुसद : नगरपरिषद उपाध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना अधिकार बहाल करण्याच्या निर्णयानंतर आता तौलाणीक संख्याबळानुसार प्रत्येक पक्ष अथवा गटाला आपल्या वाट्याला येणाऱ्या स्विकृत सदस्यांसाठीच्या उमेदवारांची नावे पहिल्याच बैठकीच्या २४ तास अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहे. जिल्हाधिकारी त्यांची पात्रता तपासून ही यादी नगराध्यक्ष पाठवतील नंतर निवडीची प्रक्रिया होणार आहे. अशा प्रकारचे परिपत्रक नगरविकास मंत्रालयाने काढले आहे. जिल्ह्यातील पुसदसह उमरखेड, दिग्रस, घाटंजी, दारव्हा, वणी आणि यवतमाळ या नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान झाले. २८ ला निकाल जाहीर झाला, निवडून आलेल्या सदस्यांची राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत नगरपालिकांची पहिली सभा घेणे बंधणकारक आहे. पहिल्या बैठकीत उपाध्यक्षांची निवड नवनियुक्त नगरसेवकांमधून हात वर करून होणार आहे. यामुळे गट अथवा पक्षाने व्हिप काढल्यास उपाध्यक्षपदासाठीच्या घोडेबाजारावर मर्यादा येणार आहे. याच बैठकीतून स्विकृत सदस्यांच्या निवडीही होणार आहेत. यावेळी बैठकीच्या २४ तास अगोदर प्रत्येक पक्षाच्या अथवा गटाच्या गटनेत्याला सभागृहातील त्यांच्या संख्याबळानुसार वाट्याला येणाऱ्या जागांऐवजी किंवा अधिक सदस्यांची नावे विहीत नमुन्यातील अर्ज भरून जिल्हाधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहेत. त्यामुळे पहिल्या बैठकीच्या अगोदरच स्विकृत सदस्यांबाबतची उत्सुकता संपणार आहे. अर्जाची छाणनी करून पात्र गावांची यादी जिल्हाधिकारी संबंधित नगराध्यक्षांकडे पाठविणार असून, संबंधित पक्षाच्या संख्याबळानुसार ती नावे असतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून सबंधित यादीची तपासणी होऊन नंतर ती यादी नगराधक्षांकडे पाठविली जाणार आहे. ही प्रक्रिया थोडी लांबलचक असली तरी पारदर्शकतेमुळे अनेकांनी या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. परंतु पहिल्या बैठकीतील आवश्यक ती उत्सुकता त्यामुळे कमी होणार असल्याचे दिसते. (तालुका प्रतिनिधी)