शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

फक्त ४० टक्के जागा भरणार, नगर परिषदांमध्ये ३१०६ पदे रिक्त : १७८२ पदांच्या परीक्षेवर आक्षेप

By अविनाश साबापुरे | Published: February 02, 2024 8:21 AM

Jobs: छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ - छोट्या शहरांतील सोयीसुविधांचा भार वाहणाऱ्या नगर परिषदांमध्ये तब्बल ५४ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील बांधकामे, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, करवसुली, स्वच्छता आदी कामे पाहणाऱ्या विभागात एकंदर पाच हजार ७७४ कर्मचाऱ्यांची गरज असताना गेल्या अनेक वर्षांपासून केवळ दोन हजार ६६८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर कामांचा भार टाकण्यात आला आहे. ही पदे भरण्यासाठी शासनाने ‘बंपर भरती’ असे नाव देऊन परीक्षा घेतली. मात्र, या परीक्षेतून केवळ ४० टक्के म्हणजे १७८२ पदे भरली जाणार आहेत. तुटपुंज्या भरतीमुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी माहिती अधिकार वापरून रिक्त पदांची माहिती मिळविली. 

बेरोजगारांचा आक्षेप काय? -नोकरीची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या तरुणांनी ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत भाग घेतला. परंतु, या परीक्षेसाठी रिक्त पदांच्या ४०% म्हणजे १७८२ जागा शासनाने गृहीत धरल्या. - ३० सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार शंभर टक्के पदभरतीची मुभा देण्यात आली आहे. असे असताना ४० टक्केच पदे का भरली जात आहेत, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.   

अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजावर परिणाम, उमेदवारांमध्ये संताप   आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदांमध्ये १ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत केवळ ४६ टक्के पदे भरलेली आहेत. तर, ५४ टक्के म्हणजेच ३१०६ पदे रिक्त आहेत. या दरम्यान शासनाने १७८२ पदांच्या भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये परीक्षा घेतली, मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. निकाल कधी लागेल याची परीक्षार्थींना प्रतीक्षा आहे. प्रत्यक्षात ही १७८२ पदे भरल्यानंतरही तब्बल १३२४ पदे रिक्तच राहणार आहेत. नगर परिषदांमधील भरती चार ते पाच वर्षांनंतर होते. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे नागरिकांनाही विविध कामांसाठी नगर परिषदांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे वारंवार हेलपाटेच मारावे लागणार आहेत. परिणामी अनेक कामे प्रलंबित राहतात. हा प्रश्न उमेदवारांनी प्रशासनाला कळविला आहे.  

पद    रिक्त      भरती होणार    रिक्तचस्थापत्य अभियंता    ५८२    ३९१    १९१ विद्युत अभियंता    ७९    ४८    ३१ संगणक अभियंता    ७७    ४५    ३२ पाणीपुरवठा अभियंता    १२६    ६५    ६१ लेखापाल, लेखापरीक्षक    ३५१    २४७    १०४ कर निर्धारक, एओ    ९९५    ५७९    ४१६ अग्निशमन सेवा    ४२३    ३७२    ५१ स्वच्छता निरीक्षक    ४७३    ३५    ४३८ एकूण    ३१०६    १७८२    १३२४ 

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्र