शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

चार एकरात झाले फक्त ५० किलो सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्याला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 9:52 PM

Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती.

घाटंजी (यवतमाळ)  - चार एकर सोयाबीनची सोंगणी केल्यावर फक्त ५० किलो पीक हाती आले. त्यामुळे हादरुन गेलेल्या शेतक-याने थेट जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिका-यांना फोन करून शेतात येण्याची विनंती केली. ‘तुम्ही येऊन पाहणी केली नाही तर जागीच जीवाचे बरेवाईट करेल’, असे सांगताच अधिका-यांनी तासाभरात शेत गाठले.घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. बुधवारी सोंगणीसाठी मशीन बोलाविले. मात्र शेंगांमध्ये दाणेच नसल्याने मशीनवाल्यानेही सोंगणीस नकार दिला. हातपाय जोडून कसेबसे काम सुरू झाले तर शेंगातून दाणे पडण्याऐवजी केवळ टरफले उडू लागली. संपूर्ण सोयाबीनचे कुटार झाले आणि केवळ ५० किलो दाणे शेतकºयाच्या हाती आले. हे पाहून सागर जागीच कोसळला. त्याने थेट तालुका कृषी अधिकाºयाला फोन करून शेतात बोलविले. तालुका कृषी अधिकारी आल्यावर त्यांनाही नुकसान पाहून दु:ख झाले. मात्र सध्याच सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आम्हाला आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागर अधिकच घाबरला. त्याने जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना फोन लावून शेतात बोलाविले. तोपर्यंत गावकरीही सागरच्या शेतात जमले होते. जिल्हा कृषी अधिकारी येईपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हा कृषी अधिकारी आले. शेतक-याचे खरोखरच नुकसान झाले असून याबाबत शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. 

 एका-एका झाडाला २०० ते ३०० शेंगा होत्या. मात्र त्यात दाणेच भरले नाही. ही चूक कुणाची याचे उत्तर शासनाने आणि कंपन्यांनी द्यावे. तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. - सागर देऊळकरशेतकरी, कोपरी

टॅग्स :Yavatmalयवतमाळagricultureशेती