शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

वीज उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीवर मंजुरीच्या अर्धाच खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 7:00 AM

राज्यात ऐन पावसाळ्यात विविध भागात सातत्याने वीज खंडित होत आहे. महावितरण कंपनी त्यासाठी ‘मान्सूनपूर्व कामे’ असे कारण सांगते. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्युत उपकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीच न झाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देआयोगाच्या निर्देशांकडे दुर्लक्षग्राहक सेवेवर परिणाम, पुरवठा होतो सतत खंडित

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेच्या अर्धाच निधी विद्युत उपकेंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीवर खर्च केला जातो. त्याचा विपरित परिणाम विद्युत सेवेवर होत असून नागरिकांना सतत खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो.राज्यात ऐन पावसाळ्यात विविध भागात सातत्याने वीज खंडित होत आहे. महावितरण कंपनी त्यासाठी ‘मान्सूनपूर्व कामे’ असे कारण सांगते. परंतु प्रत्यक्षात अनेक विद्युत उपकेंद्रांची देखभाल-दुरुस्तीच न झाल्याने ही समस्या निर्माण होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यवतमाळात तर या देखभाल-दुरुस्तीच्या निविदा गेली दहा महिने प्रलंबित आहेत.

प्रति युनिट १४ पैसे दुरूस्ती खर्च मंजूरवीज नियामक आयोगाने वितरण कंपनीच्या मालमत्तेच्या ४.५ टक्के तसेच वीज ग्राहकांंना जेवढी वीज विकली जाते, त्याच्या १४ पैसे प्रति युनिट एवढा खर्च देखभाल-दुरुस्तीवर करण्याचे बंधन घातले आहे. परंतु प्रत्यक्षात अर्धीच रक्कम त्यावर खर्ची होते. उर्वरित रक्कम नेमकी कुठे खर्च होते, हा प्रश्न आहे.

वार्षिक १५४८ कोटींचा खर्च अपेक्षितराज्यात एक लाख १० हजार ६२२ दशलक्ष युनिट वीज विकली जाते. आयोगाच्या निर्देशानुसार, १४ पैसे प्रति युनिटप्रमाणे देखभाल-दुरुस्तीवर वर्षाकाठी १५४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र अवघे ७०० ते ८०० कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे विद्युत प्रणाली पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. पर्यायाने नागरिकांना अखंड व योग्य दबाचा वीज पुरवठा मिळत नाही.राज्यात पाच हजार कंत्राटदारांची (एम्पॅनल) नियुक्ती देखभाल-दुरुस्तीसाठी करण्यात आली. महावितरणने पहिल्यांदाच हा निर्णय घेतला असून वर्कआॅर्डर जारी झाल्या आहेत. देखभाल-दुरुस्ती ही नियमित प्रक्रिया आहे, त्यावर आवश्यकतेनुसार खर्च केला जातो.- अनिल कांबळेप्रभारी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, वीज महावितरण मुंबई.राज्यात ३७२७ उपकेंद्रराज्यात तीन लाख ८६ हजार किलोमीटर वर्ग क्षेत्रफळात वितरण जाळे विखुरले आहे.४५७ शहरे व ४१ हजार ९२८ खेड्यांमध्ये दोन कोटी ७३ लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.चार क्षेत्रीय कार्यालये, १६ परिमंडळे, ४६ प्रविभाग, १४७ विभाग, ६५२ उपविभाग कार्यालयांतर्गत दहा लाख ३२ हजार ५६६ किमी वीज वाहिनीचे नियंत्रण केले जाते. ३३ केव्ही दाबाचे २७३७ उपकेंद्र आणि ३४ हजार ६९३ रोहित्र आहे. याशिवाय ६० हजार ३६७ वितरण रोहित्र आहेत.या सर्वांची निगा महावितरणकडून राखली जाते. परंतु त्याच्या देखभाल-दुरुस्तीवर दुर्लक्ष केले जाते. जनतेचा रोष मात्र फिल्डवरील अभियंते व कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.

टॅग्स :electricityवीज