शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:12 PM

राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले.

ठळक मुद्देशेतकरी परिषद : फेलोमन ट्रॅप अन ट्रायकोकार्ड वापरा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले. या संकटातून सुटका करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता फरदडच्या मागे न लागता कपाशीवर नांगर फिरवून शेत साफ करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. यामुळे किमान पुढील हंगामात किडींवर नियंत्रण मिळविता येईल असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.बळीराजा चेतना अभियान आणि कृषी विभागातर्फे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात गुरूवारी शेतकरी परिषद घेण्यात आली. त्यात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन परिसंवाद आणि जलयुक्त शिवार अभियानावर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कापसावर संशोधन करणारी मंडळी आणि शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी गुलाबी बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या. बीटी तंत्रज्ञानाने विकसीत बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी काही संकेत पाळले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले.गुलाबी बोंडअळीला नियंत्रित करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना गरजेच्या असून नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी उपटून फेकावी. त्याचा अंशही शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी कपाशी जाळावी. नंतर नांगरणी करून जमिनीची उलथापालथ करावी. यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा हल्ला होणार नाही, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.शेतकºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच या नुकसानीपासून बचाव करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच सल्ला कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक टी. एच. राठोड, सीआयसीआरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. नगराळे यांनीही दिला. या परिषदेला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्लेष नगराळे, अ‍ॅड. रामकृष्ण पाटील, विनोद जिल्हेवार, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कैलास वानखेडे, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.शास्त्रज्ञ म्हणतात ...गुलाबी बोंडअळीचे माहेरघर भारत आहे. येथूनच या अळीने जगभर उद्रेक केला. इतर ठिकाणी त्याचा उद्रेक थांबला. मात्र भारतात त्याचा उद्रेक कायम आहे.गत तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. गुजरातमध्ये त्यावर नियंत्रण करण्यात आले. त्याच पद्धतीने नियंत्रण केले, तर गुलाबी बोंडअळीवर मात शक्य आहे.शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सून पूर्व पेरणी टाळावीशेतकऱ्यांनी शक्यतो अर्ली व्हेरायटीचा अवलंब करावाफरदडचे उत्पादन घेण्याचा मोह टाळावाशेतात फेलोमेन ट्रॅप लावावा, नुकसानाची पातळी ओळखावीडोमकळ्या दिसताच त्यांचा कुचकरा करावाट्रायकोकार्डचा जादा वापर करावालाईट ट्रॅपचा वापर करावा, यामुळे गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे