शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

फटाके फोडण्यासाठी रात्री दोनच तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 5:00 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये सण-उत्सवाच्या काळात होणाऱ्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गरोदर स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होतो. यामुळे न्यायालयाने आतषबाजीची आचारसंहिताच जारी केली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत, अन्यथा कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून याबाबत प्रचार-प्रसिद्धी करावी, असेही सांगण्यात आले आहे. स्थानिक नगर परिषद, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती आवश्यक आहे. न्यायालयाने ग्रीन क्रॅकर्स याच फटाक्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. हे नियम मोडून जो कोणी आतषबाजी करील त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे समजून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदेत दिली. 

पोलीस मित्र म्हणून सतर्क राहावेसण-उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन विविध पद्धतीने गुन्हे करणारे गुन्हेगार सक्रिय होतात. अशा गुन्हेगारांना कोणीही बळी पडू नये यासाठी नागरिकांनी पोलीस मित्र बनून सतर्क राहावे. दागिने चमकवून देतो, पोलीस असल्याचे सांगून अंगझडती घेणे, बँक, एटीएम, धान्य बाजारात पाळत ठेवून नंतर अंगावर घाण असल्याचे सांगणे, वाहन पंक्चर झाल्याचे सांगणे अशा स्वरूपाच्या भूलथापा देऊन पैसे उडविले जातात. महिलांची गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळ काढला जातो. सेल्समन असल्याचे सांगत घरात चोरी केली जाते. कुलूपबंद घरांनाही लक्ष्य केले जाते. या सर्व प्रकारच्या गुन्हेगारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. सण-उत्सवाच्या काळात मालमत्तेसंदर्भातील गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांचे फिक्स पाॅइंट, पेट्रोलिंग, ऑल आउट ऑपरेशन, जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी केल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलातील ५०४ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीयवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५०४ जवानांना बढती देण्यात आली आहे. विभागीय पदोन्नती समितीने ही यादी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रविवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पोलीस दलात कार्यरत असलेल्या १०७ जमादारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या १७१ जणांना पोलीस हवालदार म्हणून बढती देण्यात आली. शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या २२६ जणांना पोलीस नाईक शिपाई म्हणून बढती देण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे गिफ्ट मिळाले आहे. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, एलसीबीप्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021