शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुसदमध्ये आडजात वृक्षांची खुलेआम कत्तल

By admin | Published: August 27, 2016 1:04 AM

घनदाट जंगलाने वेढलेल्या पुसद तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे.

पर्यावरणाला धोका : वनविभागाचे दुर्लक्ष, वनउपज तपासणी नाके कुचकामीपुसद : घनदाट जंगलाने वेढलेल्या पुसद तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. सागवानासह आडजात वृक्षांची खुलेआम तोड करून बिनधास्त वाहतूक केली जाते. वनविभागाने ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले असून होणाऱ्या वृक्षतोडीने या तपासणी नाक्यांवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.पुसद वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी घनदाट असलेले जंगल आता विरळ होत चालले आहे. माळपठारापासून कोणत्याही भागात नजर टाकल्यास हिरवीगार वनराजी दिसून येते. बहुमूल्य सागवानासह विविध जातीची वृक्षराजी या जंगलांमध्ये आहे. या भागातील आदिवासींनी जीवापाड प्रेम करून वृक्ष जतन केले आहे. वनविभागानेही कर्मचाऱ्यांची फौज लावून वृक्षसंवर्धनाचा प्रयत्न चालविला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठवाडा परिसरातील तस्कर या जंगलांमध्ये शिरत आहे. स्थानिकांना हाताशी धरुन वृक्षांची तोड केली जाते. वाहनांमध्ये भरुन भरदिवसा सागवानासह इतर वृक्ष नेले जातात. परंतु कारवाई मात्र जुजबीच होते. जंगलात फेरफटका मारला तरी सागवानाची तुटलेली थुटे दिसून येतात. सागवानासोबतच अलिकडे आडजात वृक्षाच्या तोडीलाही प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्षांची कत्तल करून त्यांची वाहतूक केली जाते. निंब, बाभूळ, आंबा, बेहळा, खैर, अंजन आदी वृक्षांची तोड केली जात आहे. पुसद वनपरिक्षेत्रात वृक्ष चोरीवर नजर ठेवण्यासाठी वनउपज तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य मार्गावर मोक्क्याच्या ठिकाणी वनउपज तपासणी नाके आहेत. मात्र या नाक्यांवर कर्मचारी क्वचितच आढळतात. रात्री तर सोडा दिवसाही कर्मचारी दिसत नाही. त्यामुळे वाहनात खाली तोडलेले सागवान आणि वरून ताडपत्रीचे आच्छादन अशी वाहतूक केली जाते. पर्यावरण प्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र अद्यापपर्यंत कुणावरही कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)