यवतमाळ : जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्यावतीने जिल्ह्यातील युवकांसाठी नि:शुल्क बांधकाम प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी कमीत कमी चौथी पास असलेल्या युवकांसाठी बांधकाम क्षेत्रातील विटा जुडाई व फार्मवर्क, सरळी फिटींग या तीन ट्रेडसाठी प्रशिक्षण तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षण कार्यक्रम नि:शुल्क असून प्रशिक्षण अहमदनगर व लातुर येथे दिल्या जातील. प्रशिक्षणानंतर मासिक दहा हजार पाचशे रुपये मानधन व निवास व्यवस्था असणारा रोजगार दिला जातील. रोजगार हा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर या शहरात राहणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यावेतन दिले जाणार नाही. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणीक पात्रतेच्या कागदपत्रासह १८ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था पांढरकवडा, १९ जानेवारी रोजी फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद, २२ जानेवारी रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी व २७ जानेवारी रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे अर्ज सादर करावे, जिल्ह्यातील संबंधित सर्व लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
बांधकाम क्षेत्र कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी
By admin | Published: January 18, 2016 2:33 AM