शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मातेच्या क्षणिक अविचाराने लेकरं झाली अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:26 PM

तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली.

ठळक मुद्देलाठी येथील खूनप्रकरण : मायाला मिळाली न्यायालयीन कोठडी, तुरूंगात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली. बाप संपला, आई कैदेत राहणार, तर ही मुले कोणाच्या आधाराने दिवस काढतील, हा हृदयद्रावक प्रश्न लाठीवासीयांच्या मनाला छळत आहे.मोतीराम धोबे यांचे मुळ गाव चंद्रपूर तालुक्यातील हडस्ती. १९९८ साली वढा येथील मायाचे मोतीरामसोबत लग्न झाले. संसाराच्या वेलीवर दोन फुलेही उमलली. २००९ मध्ये मोतीरामला भालर वसाहतीत एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे त्यांचे कुटुंब भालर जवळील लाठी येथे स्थायिक झाले. लाठीतच स्वत:चे घर उभारले. मात्र मागीलवर्षी सुरक्षा रक्षकांची कंपनी बंद पडल्याने त्याचे काम सुटले. तेव्हापासून दोेघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवित होते. मोठी मुलगी मिनल ही चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाला शिकत आहे. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातच राहते, तर मुलगा भालर येथील विद्यालयात नववीला शिकत आहे. मोतीराम हा सुरूवातीपासूनच मायाकडे संशयाच्या नजरेनं पाहत असल्याचे मायाने सांगितले. दरम्यान त्याला दारूचे व्यसनही लागल्याने त्याने दारू पिऊन मायाला त्रास देणे सुरू केले. पतीच्या त्रासापायी मायाने दोन वर्षापूर्वी घरात फाशी लावून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारच्या लोकांनी तिला त्यावेळी वाचविले. संशयाच्या भूताने पछाडलेला मोतीराम मायाला माहेरीदेखील जाऊ देत नसे. जर ती माहेरी गेली तर तेथे जाऊन धिंगाणा घालायचा, असे माया सांगते. गुरूवारी रात्री घरी स्वयंपाक शिजला नाही. तिघेही जण उपाशीच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे ५ वाजता मोतीरामने मायाच्या अंगावर फ्रिजमधील थंड पाणी टाकून उठविले व तुझी फोनवरील आॅडिओ क्लीप मी ऐकली आहे. तु रिपोर्ट द्यायला ठाण्यात चल, असा तगादा लावला. मात्र मायाजवळ याचा काही पुरावा नसल्याने तिने नकार दिला. त्यावरून मोतीरामने तिला काठीने मारणे सुरू केले. तेव्हाच मायाने तिचा चंद्रपूर येथील दीर संदीप धोबे याला फोन करून माहिती दिली. आज तुझा भाऊ किंवा मी तरी मरणार, असेही सांगितले.त्यानंतर तिने मोतीरामच्या हातातील काठी हिसकावून त्या काठीने मारणे सुरू केले. तेव्हा मोतीरामने पायाच्या कैचित मायाची मान पकडून दाबण्याचा प्रयत्न केला. त्यातून मायाने सुटका करून स्वत:च्या ओढणीने गळा आवळून मोतीरामला ठार केले.त्यानंतर तिने पुन्हा दिराला फोन करून मोतीरामचा मी खून केल्याचे सांगितले. तेवढ्यात मुलगा यशही झोपेतून उठला. त्यानेही आरडाओरड केल्याने गावकरी जमले. ही माहिती शिरपूर ठाण्याला दिली. त्यावरून ठाणेदार दीपक पवार तातडीने लाठीला पोहोचले. मायाला अटक केली. न्यायालयाने तिला एक दिवसाची कोठडी सुनावली. मायाने गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केली.निराधार झालेल्या मुलाच्या शिक्षणाचे काय?आता माया जामीन मिळेपर्यंत तुरूंगात राहणार. त्यामुळे तिची मुलगी मिनल व मुलगा यश यांच्या शिक्षणात अडथळा तर येणार नाही ना, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या मिनल व यशही हडस्ती येथे आजीआजोबांकडे आहे. तेथेच मोतीरामवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. कुटुंबियांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पाडू नये, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Murderखून