विलास गावंडे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. हजारात होणारे काम लाखांवर नेले जात आहे. खर्चाची आकडेवारी संशयास्पद असताना साधी चौकशी करण्याचे सौजन्यही अधिकाºयांकडून दाखविले जात नाही. एका अपघातग्रस्त बसच्या कामात झालेला भ्रष्टाचार याचे ताजे उदाहरण आहे. या कामात ‘ओटी’च्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आहे.‘एसटी’ तोट्यात आहे, असे वारंवार सांगितले जाते. यासाठी सर्वाधिक जबाबदार वाहकांना धरले जाते. तिकीट चोरीमुळेच एसटीचा तोटा वाढल्याचे ‘एसटी’चे ठाम मत आहे. म्हणूनच की काय, इतर विभागात चालणाºया भ्रष्टाचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. यांत्रिकी विभागातील स्पष्ट दिसणारा गैरप्रकार पकडला जात नाही.यवतमाळ आगाराच्या एमएच ०७/९३९७ या क्रमांकाच्या बसला ६ नोव्हेंबर २०१६ रोजी अपघात झाला. दुरुस्तीसाठी ही बस एसटीच्या विभागीय कार्यशाळेत लावण्यात आली. या बसच्या दुरुस्तीसाठी लागणाºया साहित्याचा खर्च केवळ ११ हजार ८४४ रुपये २८ पैसे दाखविला गेला. कामाची मजूरी ६६ हजार ६१८ रुपये देण्यात आली आहे. कार्यशाळेतील कामगारांनीच दुरुस्तीचे काम केलेले आहे. अतिरिक्त कामाचा मोबदला या कामगारांना देण्यात आला. नऊ कामगारांनी ६१४ तास काम करून बस दुरुस्त केली. १५० रुपये प्रती तास ‘ओटी’ असलेल्या कामगारांकडून ही कामे करून घेण्यात आली. वास्तविक कमी रकमेचा ओटी असलेले कामगार महामंडळात आहे. कामही सोपे होते. तरीही ओटीवर उधळपट्टी करण्यात आली. नवीन बस बांधणीसाठीही एवढे तास लागत नाही, असा कुशल कामगारांचा अनुभव आहे. त्यामुळे कामाचे वाढलेले तास जास्त ओटीच्या रकमेच्या कामगारांकडून करून घेतलेल काम, हा सर्व प्रकार ‘ओटी’तील घोटाळाच असल्याच्या बाबीला बळ देणारी आहे.२० लाख रुपयाचा फटकाथोड्याशा कामासाठी सदर बस सरासरी सहा महिने उभी राहिली. दररोज किमान १० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे २० लाख रुपयांचा फटका एसटीला बसला आहे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बस उभी राहात असल्यास आरटीओ विभागाला कळवून टॅक्स वाचविला जाऊ शकतो. एसटीने ही तसदीही घेतली नाही. डिसेंबर, जानेवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात ही बस उभी होती. फेबु्रवारीत केवळ १९७ किलोमीटर चालली.बस दुरुस्तीसाठी दाखविल्या गेलेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी. यात आढळणाºया दोषींवर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करावी.- अरुण गाडगे,प्रादेशिक सचिव कामगार सेना
एसटीत ‘ओटी’ घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:38 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. हजारात होणारे काम लाखांवर नेले जात आहे.
ठळक मुद्देअपघातग्रस्त बस : दुरुस्तीचे साहित्य ११ हजारांचे, मजुरी ६६ हजार रुपये