लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार वरिष्ठांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शिवाय प्रवाशांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तुटवडा असताना चालक-वाहकांना आस्थापनेत वापरले जात आहे. आवश्यकता नसताना अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा वापर सुरू आहे. कमी बेसिकच्या कामगारांना टाळून जास्त बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची संधी दिली जात आहे. सध्या विभाग नियंत्रकांचा प्रभार यवतमाळ विभागातील कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या अधिकाºयांकडे आहे. त्यांच्याकडून कामगारांना मोठ्या अपेक्षा आहे.टायरच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या बसेस, दुरुस्तीच्या कामांमध्ये होणारा विलंब, तिकीट मशीनचा तुटवडा या आणि इतर कारणांमुळे बसफेºया रद्दचे प्रमाण वाढले आहे. यवतमाळसह सर्व आगारात ही बोंबाबोंब आहे. सर्वाधिक बसफेºया ग्रामीण भागातील रद्द होतात. यात मानव विकास मिशनच्याही बसेसचा समावेश आहे. परिणामी ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्थेने शाळेत जावे लागते. या बसेसचे मेन्टनंसही योग्य प्रकारे होत नाही. मंगळवारी यवतमाळ आगारातून सकाळची पांगरी, धामणगावच्या दोन फेºया रद्द झाल्या.चालक-वाहकांचा तुटवडा असल्याची ओरड होते. दुसरीकडे मात्र या कामगारांचा वापर कार्यालयीन कामासाठी केला जात आहे. फेरिनिहाय मूल्यांकन तक्ता तयार करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक कर्मचारी बसविण्यात आले आहे. परिवहन महामंडळाच्या नियमानुसार कामगिरी सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते. रात्री उशिरा आगारात दाखल होणाºया वाहकांकडील हिशेब रात्रीच घेतला जात नाही. यात चालढकल केली जात आहे. संबंधित कर्मचारी ठरलेल्या वेळेआधीच निघून जात असल्याची माहिती आहे. आता त्यांना रात्री १.३० वाजतापर्यंत थांबविले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हिशेब रात्रीच होत नसल्याने तिकीट मशीनचा तुटवडा निर्माण होतो. प्रसंगी मशीन नसल्याच्या कारणावरून फेºया रद्दची वेळ येते.तिकीट ट्रे वापरण्यास टाळाटाळयवतमाळ विभागात तिकीट मशीनचा तुटवडा नवीन राहिलेला नाही. चार्जींग संपले, रोल नाही अशी अनेक कारणे यासाठी आहेत. यावर महामंडळाकडे तिकीट ट्रे चा सक्षम पर्याय आहे. मात्र काही वाहकांकडून ट्रे वापरण्यास चक्क नकार दिला जातो. बसफेरी रद्द केली जाते, पण ट्रे वापरला जात नाही. अधिकाºयांचा नसलेला वचक, मर्जीतील लोकांना दिली जाणारी सोईची कामगिरी यामुळे कामगार असे वागत असल्याचे सांगितले जाते. यात मात्र महामंडळाचे नुकसान होत आहे.
‘एसटी’चा कारभार नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:34 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार वरिष्ठांच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. शिवाय प्रवाशांनाही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
ठळक मुद्देउत्पन्नाची बोंबाबोंब : चालक-वाहकांचा आस्थापनेत वापर