शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले

By विशाल सोनटक्के | Published: December 20, 2023 11:10 AM

पत्नी, सासरा, दोन साळ्याची निर्घून हत्या, सासूची प्रकृती चिंताजनक

कळंब (जि. यवतमाळ ) : घरगुती वादातून जावयाने आपल्या पत्नीसह सासरा, आणि दोन साळ्याचे हत्याकांड घडवून आणले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण तिरझडा गाव हादरुन गेले आहे. आरोपी गोविंदा बिरजूचंद पवार (४०,रा.कळंब) याला पोलिसांनी रात्रीच अटक केली. मुलीला त्रास देतो म्हणून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी जावई गोविंदाला मारहाण केली. त्याचा राग मनात ठेवून त्याने चौघांना संपविल्याचे आता तपासात पुढे येत आहे.मृतकामध्ये सासरा पंडीत भोसले (५५), साळा नाना भोसले (३२)व  सुनिल भोसले (२५) आणि आरोपीची पत्नी रेखा पवार (३०) यांचा समावेश आहे. तर सासू रुख्मा भासले ही गंभीर जखमी असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काही दिवसापुर्वी सासरा पंडीत भोसले व त्यांच्या कुटंबातील सदस्यांचा जावई गोविंदा पवार यांच्यामध्ये वाद झाला होता. मुलीला त्रास देण्याच्या कारणावरुन त्यांच्यात खटके उडाले होते. त्यावेळी जावई असणाºया गोविंदा पवार याला मारहाणही झाली होती. त्यानंतर सर्व व्यवस्थीत झाले. आरोपी गोविंदा पवार हा कळंबचा रहीवाशी असला तरी तो मागील एक महिन्यापासून सासºयाकडे तिरझडा गावात राहत होता. परंतु त्याला मारहाण करण्यात आल्याचा राग त्याच्या मनात घर करुन असल्याचे सांगण्यात आले.

त्यातूनच त्याने काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान आरोपी गोविंदा शेतात जागली असणारा साळा सुनिलसाठी जेवनाचा डब्बा घेऊन गेला. यावेळी त्याने आपल्यासोबत पत्नी रेखाला घेतले. त्यानंतर गोविंदाने शेतातच साळा सुनिल भोसले व पत्नी रेखाच्या डोक्यावर सबलीचे वार करुन जागीच ठार केले. दोघांना मारल्यानंतर तो तिरझडा गावात घरी परत आला. घरात झोपेत असणारे सासरे पंडीत व मोठा साळा नाना याचेही डोक्यावर आणि मानेवर सबलीने वार केले. यात ते जागीच ठार झाले. यादरम्यान सासू रुख्मा ही जागी झाली. त्यानंतर तीलाही मारण्यासाठी गोविंदाने आपला मोर्चा तिच्याकडे वळविला. तिच्यावरही घाव घालण्यात आले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. चारही मृतकांचे मृतदेह कळंब येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या चौरंगी हत्याकांडाची तिरझडा गावासह कळंब तालुक्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.