आकाश कापसे ।लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : गुलाबी बोंडअळीमुळे गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मांगलादेवी येथे यावर्षीही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता धास्तावला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी विभागाने येथील शेतकऱ्यांना दिलेले कामगंध सापळेसुद्धा कुचकामी ठरत आहे.गतवर्षी कपाशीला आलेली बोंड फुटली नाही. तेव्हा गुलाबी बोंडअळी सर्वांच्या निदर्शनास आली. यावर्षी मात्र ही अळी सुरुवातीलाच पाती फुलावरच असताना शेतकºयांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. महागडे आणि जहाल विष असलेल्या किटकनाशकाची फवारणी केली जात आहे. तरीही बोंडअळीचा प्रकोप सातत्याने वाढत असल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे. कृषी विभागाने दिलेले कामगंध सापळे शेतात लावण्यात आले. त्यामध्ये नर कीटक पतंग अटकून बोंडअळीवर नियंत्रण मिळविता येईल, असे सांगितले गेले. परंतु या सापळ्यात कीटक अटकत नसल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे. बोंडअळीचा प्रकोप सातत्याने वाढत असल्याने येथील शेतकरी कैलास परोपटे यांनी अखेर कपाशीचे उभे पीक उपटून टाकले आहे.शेतकºयांना धीर देण्यासाठी व त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशासनही कामी लागले आहे. कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी, कृषी तज्ज्ञ मार्गदर्शन आणि जनजागरणाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. मनोरंजनातून प्रबोधन व्हावे यासाठी कलापथकाचा कार्यक्रम घेतला जात आहे. तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन बोंडअळीच्या प्रादुर्भावावर करावयाच्या उपाययोजना, कीटकनाशके फवारताना घ्यावयाची खबरदारी आदी विषयावर कृषी विभागाचे कर्मचारी जनजागृती करत आहेत. येथील शेतकरी गजानन महल्ले यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी कुमरे, मंडळ कृषी अधिकारी जाधव, पोलीस पाटील विनोद कापसे, उपसरपंच प्रमोद पुनसे आदींनी मार्गदर्शन केले.
बोंडअळीने गाजलेल्या मांगलादेवीत पुन्हा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 10:33 PM
गुलाबी बोंडअळीमुळे गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या मांगलादेवी येथे यावर्षीही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता धास्तावला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कृषी विभागाने येथील शेतकऱ्यांना दिलेले कामगंध सापळेसुद्धा कुचकामी ठरत आहे.
ठळक मुद्देसापळे कुचकामी : शेतकरी हादरले, कृषी विभाग थेट शेतात