लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : पुसद आणि उमरखेड उपविभागात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी दिग्रस, पुसद, उमरखेड आणि महागावमधील ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.गेल्या महिन्यापासून पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी या चारही तालुक्यातील ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक दिग्रस तालुक्यातील दहा पुरुष व १२ महिला अशा २२ जणांचा समावेश आहे. महागावमधील ११ पुरुष आणि दोन महिला, उमरखेडमधील दहा पुरुष आणि एक महिला तर पुसदमधील चार पुरुष आणि दोन महिलांचा यात समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे.प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. काही रुग्णांना उपचारार्थ यवतमाळला पाठविण्यात येत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे. एकट्या पुसद तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने १८ जणांचे बळी घेतले. पुसद तालुक्यात तूर्तास १२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. एकूण बाधितांची संख्या ६१६ वर पोहोचली आहे. पुसद येथील स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने बँकेने पुढील सूचनेपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुसदमध्ये शनिवारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.हिवरा संगम येथे कोरोनाचा शिरकावमहागाव तालुक्यातील हिवरा संगम येथेही शनिवारी कोरोनाने शिरकाव केला. हिवरा ही आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मुख्य बाजारपेठ आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र आजपर्यंत हिवरा येथे कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. शुक्रवारी सायंकाळी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. गावातील २० ते २५ जणांना तपासणीसाठी महागाव येथील कोविड सेंटरमध्ये पाचारण केले आहे. हिवरा येथील एकविरानगरमधील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी केले आहे.
पुसद, उमरखेड, दिग्रस व महागाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 5:00 AM
प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाचीही पाचावर धारण बसली आहे. पुसदमधील आसारपेंड येथील वसतिगृह व आयुर्वेदिक रुग्णालय, उमरखेडमधील मरसूळ, दिग्रस आणि महागाव येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. काही रुग्णांना उपचारार्थ यवतमाळला पाठविण्यात येत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे.
ठळक मुद्देदिग्रसमध्ये भडका । महागावातही संख्येत वाढ, प्रशासनाची उडाली तारांबळ