शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

अतिपावसाने शंभर एकर जमीन खरडली

By admin | Published: June 26, 2017 12:52 AM

काळी दौ. परिसरातील कौडगाव शिवारातील जमीन मुसळधार पावसाने खरडून गेली. यामुळे १०० एकर जमीन

 शेतकरी संकटात : कौडगाव शिवारात नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : काळी दौ. परिसरातील कौडगाव शिवारातील जमीन मुसळधार पावसाने खरडून गेली. यामुळे १०० एकर जमीन बाधित झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले. गेल्या १३ जून रोजी पुसद तालुक्यासह लगतच्या तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहिले. यावेळी महागाव तालुक्यातील कौडगाव परिसरात पांदण रस्त्याचे काम सुरू होते. अद्यापही हे काम अर्धवट आहे. झालेले कामही सदोष आहे. पांदण रस्त्याच्या बांधकामात पाण्याची नीट विल्हेवाट लावण्याबाबत उपाययोजना करण्यात आली नाही. टाकलेले पाईपसुद्धा अत्यंत लहान असल्याने जागोजागी पाणी तुंबले आहे. या सदोष बांधकामामुळे मुसळधार पावसाचे पाणी लगतच्या शेतात शिरून जवळपास १०० एकरवरील जमीन खरडली आहे. या शेतातील संपूर्ण मातीच वाहून गेली. जागोजागी धुरे फुटलेले आहे. काही शेतांना तलावाचे स्वरूप आले. यामुळे नुकतीच पेरणी केलेले खरिपाचे बियाणेही वाहून गेले. काहींच्या शेतातील अंकुरलेली रोपेही वाहून गेली. कौडगाव-पिंपळगाव या पांदण रस्त्याचे बांधकाम पंचायत समिती महागावअंतर्गत सुरू आहे. अद्याप हे काम अर्धवटच आहे. झालेले कामही सदोष असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. प्राजक्ता शैलेश कन्नावार, आनंदराव भोने, इंदल जाधव, रमेश तुकाराम डुबेवार, रमेश भोगावकर, शांताबाई भोने आदी शेतकऱ्यांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.