शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

कोरोनावर दोन दिवसांत दोन हजार रुग्णांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 5:00 AM

सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ४९१ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. या पैकी दोन हजार ४९८ रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असून तीन हजार ९९३ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ७६० झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ९४३ इतकी आहे.

ठळक मुद्दे४९ जणांचा मृत्यू : ॲक्टिव्ह साडेसहा हजार, ४७ हजार कोराेनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी व रविवारी एकंदर दोन हजार ११० जण कोरोनामुक्त झाले तर या दोन दिवसात १७४९ नवे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शिवाय शनिवारी २४ आणि रविवारी २५ अशा ४९ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.  सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ४९१ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. या पैकी दोन हजार ४९८ रुग्ण विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार घेत असून तीन हजार ९९३ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ७६० झाली आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४६ हजार ९४३ इतकी आहे. या दरम्यान जिल्ह्यात १३२६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सद्यस्थितीत जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटिव्हिटी दर १२.७५ इतका आहे. तर कोरोना मृत्यूदर २.४२ इतका झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी ९८१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात ६२७ पुरुष व ३५४ महिला आहेत. त्यात यवतमाळ येथील २०६, वणी १२३, पुसद ११२, पांढरकवडा १०२, घाटंजी ८२, दारव्हा ६३, आर्णी ६१, बाभूळगाव ४८, झरी ४५, नेर ३१, दिग्रस २५, राळेगाव २२, मारेगाव १९, कळंब १२, उमरखेड ७, महागाव ५ आणि अन्य शहरातील १८ रुग्णांचा समावेश आहे. तसेच रविवारी ७६८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यात ४७९ पुरुष व २८९ महिला आहे. यवतमाळ येथील १४२, घाटंजी ११८, उमरखेड १०७, पांढरकवडा ७२, वणी ६३, मारेगाव ५६, कळंब ४३, महागाव ३४, दारव्हा ३०, पुसद २६, नेर २५, झरी २०, बाभूळगाव १५, राळेगाव ६, दिग्रस ५, आर्णी ३ आणि अन्य शहरातील तीन रुग्णांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ४ लाख २९ हजार ४७१ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४ लाख २२ हजार १३३ अहवाल प्राप्त झाले. तसेच ३ लाख ६७ हजार ३७३ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप सात हजार ३३८ अहवालांची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. 

  रविवारी गेलेले २५ बळी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय :  यवतमाळ शहरातील ३७, ६५ वर्षीय पुरुष, ५९, ६३ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ६४, ६६ वर्षीय पुरुष, वणी येथील ८१, ४३, ४५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ३० वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, आर्णी येथील ६७ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ५९ वर्षीय महिला, दिग्रस येथील ३५ वर्षीय महिला, माहूर येथील ७० वर्षीय पुरुष आणि धामणगाव येथील ५६ वर्षीय पुरुष.- डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर :  वणी येथील ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, उमरखेड येथील ६३ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ४५ वर्षीय पुरुष व ८० वर्षीय महिला, राळेगाव येथील ५५ वर्षीय पुरुष. - खासगी रुग्णालय : वणी येथील ५० वर्षीय पुरुष आणि पुसद येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.  

 शनिवारी गेलेले २४ बळी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : यवतमाळ शहरातील ४०, ५२, ६४, ६३ वर्षीय पुरुष आणि ३१ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, नेर येथील ६५ वर्षीय महिला, तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला, पांढरकवडा येथील ५६ वर्षीय पुरुष, बाभूळगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुष, वणी येथील ३२ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला, तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, मारेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील ४० वर्षीय पुरुष, आर्णी येथील ६५ वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील ७८ वर्षीय पुरुष आणि माहूर जि. नांदेड येथील ६५ वर्षीय महिला. - डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर :  पांढरकवडा तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. - खासगी रुग्णालय :  ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या