रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना माहामारीत प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने प्रत्येक ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यावर मात करण्यासाठी हवेतून थेट ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट जिल्ह्यात उभे केले जाणार आहेत. पुढील १५ दिवसात हे प्लान्ट जिल्ह्यात उभे राहणार आहेत. यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करता येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे आठ प्लान्ट उभे होत आहेत. यासाठी पीएसए तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रेशर स्विंग ॲसाॅर्पशन टेक्नॅालॉजीने या अद्ययावत मशीनमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करता येणार आहे. या प्लान्टसाठी लागणाऱ्या मशीनरी यूके आणि फ्रान्समधून आणल्या जाणार आहेत. हे प्लान्ट उभे करण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हा विकास निधीतून या मशीन खरेदी केल्या जाणार आहे. आरोग्य यंत्रणेसाठी राखीव असलेल्या निधीतून हा खर्च होणार आहे. यामुळे ऑक्सिजन निर्मितीच्या कामात जिल्हा भविष्यात स्वयंपूर्ण होणार आहे. या यंत्रसामग्रीवरून प्रारंभी छोटे प्लान्ट कार्यान्वित होणार आहेत. त्यामध्ये स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील मशीनरी कार्यान्वित होणार आहे. यामुळे प्रत्येक मिनिटाला ९० लिटरपासून प्रत्येक मिनिटाला ४२५ लिटर क्षमतेपर्यंतचा प्लान्ट पहायला मिळणार आहे. जिल्ह्यात आठ ठिकाणी असे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभे केले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच केंद्रांची निर्मिती होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन केंद्र उभे होणार आहेत. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट या ठिकाणी उभे होणार आहेत. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालय, वणी, उमरेखड आणि राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लान्टमध्ये प्रत्येक मिनिटाला ८५० लिटरची निर्मिती होणार आहे. स्त्री रुग्णालयात ४२५ लिटर प्रतिमिनिटाला निर्मिती होणार आहे. तर ग्रामीण रुग्णालयात प्रति मिनिटाला ९० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दारव्हा, पांढरकवडा आणि पुसद उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभा होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्ह्याची भक्कम स्थिती पहायला मिळणार आहे. यातून भविष्यातील संकटाला थोपविता येणार आहे. पुढील काळात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास हे ऑक्सिजन प्लांट जिल्ह्याच्या आणि रुग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू रोखता येणार आहे. आरोग्य यंत्रणा यातून सक्षम होईल.
प्रत्येक दिवसाला हवे १९ मेट्रिक टन ऑक्सिजनजिल्ह्याला सद्यस्थितीत साडे एकोणवीस मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. १९५० सिलिंडर दर दिवसाला वापरावे लागत आहे. पुढील महिनाभरात वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वात मोठा प्रत्येक मिनिटाला ८५० लिटर ऑक्सिजन निर्मिती करू शकणारा हा प्लान्ट उभा राहणार आहे.
जिल्ह्यात पीएसए टेक्नॅालॉजीचे ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट उभे राहणार आहेत. पुढील १५ दिवसात हे प्लान्ट उभे दिसतील. यामुळे ऑक्सिजनच्या प्रश्नावर मात करता येणार आहे. या मशीनरी विदेशातून मुंबईत आणि तेथून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. - अमोल येडगेजिल्हाधिकारी, यवतमाळ