शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

वेदना अन् माणसाचं नातं घट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:19 PM

आयुष्यात वेदनाच आल्या नसत्या, तर सिंधुताई सपकाळ घडल्या नसत्या. वेदना अन् माणसाचं नातं घट्ट आहे, असे सांगत सिंधुताई सपकाळ यांनी आपला जीवनक्रम उलगडला अन् नेरमध्ये अविस्मरणीय आठवणी ठेऊन गेल्या.

ठळक मुद्देसिंधूताई सपकाळ : नेर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती

ऑनलाईन लोकमतनेर : आयुष्यात वेदनाच आल्या नसत्या, तर सिंधुताई सपकाळ घडल्या नसत्या. वेदना अन् माणसाचं नातं घट्ट आहे, असे सांगत सिंधुताई सपकाळ यांनी आपला जीवनक्रम उलगडला अन् नेरमध्ये अविस्मरणीय आठवणी ठेऊन गेल्या.येथे विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना मांडले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष वनिता मिसळे, आयोजक व नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, यांची यावेळी उपस्थिती होती.शिक्षण ते अनाथांची माय, असा जीवनक्रम त्यांनी संवाद साधताना मांडला. म्हशी पाण्यात बसवायच्या अन् शाळेत जायचे. अशाच पध्दतीने चौथीपर्यंत शिक्षण झाले. शाळेला उशीर झाला की मास्तर मारायचे. शेतात म्हैस गेली म्हणून शेतमालकाच्या हातचा मार खायचा. वैवाहिक जीवनातही सुख मिळालं नाही. पतीने मारहाण करून घरातून हाकलून दिलं. रेल्वे स्टेशनवर भीक मागितली. ईभ्रत वाचविण्यासाठी स्मशानाचा आधार घेतला. पोटासाठी चितेवर भाकरी भाजली. जीवनात आलेल्या अशा विविध अनुभवातून सिंधुताई अनाथाची माई बनली.मुलगा-मुलगी हा भेदभाव बाळगू नका. मुलींनी अंगभर कपडे घालावे. मुलगी माई वाटली पाहिजे असेही आवाहन सिंधुतार्इंनी केले. त्या म्हणाल्या. २९२ जावई, ४९ सुना व १७५ गाई. ७५० पुरस्कार, तीन राष्ट्रपतींनी केलेला सन्मान घेतलेली माई आज ममता बाल सदन (कुंभारवळन, ता. पुरंदर, जि पुणे) चालविते.आपल्या मृत्यूनंतर अनाथ मुलांचा हा डोलारा माझी लेकरं चालवतील. त्या दृष्टीने त्यांनी पावले उचलल्याचे त्या म्हणाल्या. जीवनात जो माफ करणे शिकला, तोच पुढे जाईल. हार मानू नका. २० वर्षांची असताना मी स्वत:ला वाचवू शकली मग आपण का नाही. सन्मान करणे शिका, जीवन मंगलमय होईल, असा संदेश सिंधुताई सपकाळ यांनी दिला.