लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.चक्रवती नदीला पाणी असले की, शहरातील पाण्याची पातळी वाढते. जलस्रोतांना पाणी येते. विशेष म्हणजे कळंब शहराला ज्या काही विहिरीतून पाणीपुरवठा होतो, त्या विहिरी चक्रवती नदी काठावर आहे. या विहिरीजवळ जास्तीत-जास्त पाणी कसे साठवून राहील, याकडे नगर पंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्यादृष्टीने कोणीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे विनाकरण पाणी वाहुन जात आहे.नागरिकांनी घेतला पुढाकारनगरपंचायत प्रशासनाला सांगुनही काहीच करीत नसल्याने गावकऱ्यांनी पाणी थांबविण्यासाठी पन्नीचा वापर करुन बांध घातला. धोटे गुरुजी, प्रभाकर सहारे, गोलू धांदे, नानु धांदे, चंदु सहारे, लक्ष्मण गाढवे, नीलेश मोहुर्ले, मारोती सहारे, विजय ठेंगरी, मंगेश ठाकरे आदींनी पुढाकार घेतला. दिलीप बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. नगरंपचायत मात्र गंभीर नाही, हे खेदाने म्हणावे लागेल.
कळंबच्या चक्रवतीत तलावाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 9:43 PM
शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.
ठळक मुद्देपाणी साठवण्याकडे दुर्लक्ष : सदोष बंधाऱ्यामुळे अपव्यय, अखेर नागरिकांनी घेतला पुढाकार