लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : भरधाव मेटॅडोअरने समोरून येणाºया कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील मांगुळ गावाजवळ शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की मेटॅडोअरची लोखंडी पट्टी गळ्यातून आरपार गेल्याने पोलीस पाटलांचा मृत्यू झाला.अमोल भाऊराव शिंदे (३६) असे मृत पोलीस पाटलाचे नाव आहे. ते यवतमाळवरून शनिवारी रात्री आर्णीकडे येत होते. त्यावेळी मांगुळ गावाजवळ समोरून येणाºया मेटॅडोअरने (क्र.एम.एच.१८/एफ-१६८५) जबर धडक दिली. कारच्या चालकाच्या बाजूने धडक लागली. त्यातच मेटॅडोअरची लोखंडी पट्टी अमोलच्या गळ्यातून आरपार गेली. तसेच त्यांचा डावा हातही तुटला. यातच त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर भरधाव मेटॅडोअरही रस्त्याच्या कडेला जावून उलटला. अमोल हा मित्रमंडळामध्ये मीतभाषी असल्याने लोकप्रिय होता. तो सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह राहात होता. शनिवारी त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने टाकलेली फेसबुकवरील पोस्ट शेवटची ठरली. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पांगरीचे पोलीस पाटील अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:10 AM
भरधाव मेटॅडोअरने समोरून येणाºया कारला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले.
ठळक मुद्देमांगुळजवळची घटना : मेटाडोअरची कारला धडक