शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

पारवा सरपंच पतीच्या खुनातील सहा आरोपींना रायगडमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:30 PM

लगतच्या पारवा येथील सरपंच पतीच्या खून प्रकरणातील सहा आरोपींना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथून अटक करण्यात टोळी विरोधी पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपसार दोघांचा शोध सुरू : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लगतच्या पारवा येथील सरपंच पतीच्या खून प्रकरणातील सहा आरोपींना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथून अटक करण्यात टोळी विरोधी पथकाला यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.पारवा येथे मंगेश गावंडे यांचा २७ मार्चला खून करण्यात आला होता. १२ जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविला. यापैकी प्रवीण भगत, भीमराव अवथरे, सुनील देवतळे, हनुमान पेंदोर यांना यापूर्वीच अटक केली होती. उर्वरित आरोपी मुंबईकडे पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून टोळी विरोधी पथक कुर्ला, मुलूंड, डोंबिवली परिसरात तळ ठोकून होते. दरम्यान आरोपी खोपोलीत बांधकाम मजूर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून एपीआय संदीप चव्हाण, पीएसआय संतोष मनवर यांचे पथक तेथे धडकले. सापळा रचून सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यात राज गोपाल ठाकूर, मुन्ना गोपाल ठाकूर, विनोद प्रकाश चपरिया, भूपेंद्र ऊर्फ गोपी मनिराम शिबलकर, शुभम सुरेश टेकाम आणि सुमीत महादेव मेश्राम यांचा समावेश असल्याचे एसपी एम. राज कुमार यांनी सांगितले. उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पियुष जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकूंद कुळकर्णी उपस्थित होते.टोळीशी संबंध नाहीखूनप्रकारात अटकेतील आरोपींपैकी कुणाचाही कोणत्याही टोळीशी संबंध असल्याचे निदर्शनास आले नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिली. मात्र मुन्ना गोपाल ठाकूर याच्यावर प्रवीण दिवटे हत्याकांडातील आरोपींना आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा