शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 1:04 PM

कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकामांना परवानगी, संचारबंदीही वाढविली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे. १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी या संबंधी आदेश काढले.कोरोना बाधित १५ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाल्याने यवतमाळ जिल्ह्याचा ह्यरेड झोनह्णमध्ये समावेश करण्यात आला आहे. पुढे रुग्ण संख्या न वाढल्यास १३ मेनंतर जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश होऊ शकतो. संशयावरून दररोज नागरिकांना वैद्यकीय निगराणीत ठेवले जात आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. दरदिवशी अहवाल येत असून ते बहुतांश निगेटीव्ह राहत आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार सोमवार २० एप्रिलपासून काही बाबींसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बºयाच क्षेत्रातील कामकाज सुरू होण्यास मदत मिळणार आहे.अधिकारी पूर्ण, कर्मचारी ३३ टक्केसोमवारपासून केंद्र शासनाची आरोग्य व कुटुंब कल्याण, आपती व्यवस्थापन, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र, एनसीसी, नेहरु युवा केंद्र हे कार्यालय सुरू राहतील. राज्य शासनाची पोलीस, होमगार्ड, अग्नीशमन दल, आपतकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह, नगरपरिषद, नगरपंचायती कोणत्याही निबंर्धाशिवाय सुरू राहतील. राज्य शासनाच्या इतर खात्याचे वर्ग अ आणि ब चे अधिकारी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहतील. गट क संवगार्तील कर्मचाºयांच्या ३३ टक्के उपस्थितीने कार्यालय सुरू राहतील. त्यांना सामाजिक अंतर पाळणे व सामान्य जनतेला पूर्ण सेवा देण्याचे बंधन आहे. जिल्हा प्रशासन व कोषागार ही कार्यालये निर्बंधित कर्मचारी संख्येने सुरू राहतील. सार्वजनिक सेवांच्या उपलब्धतेसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नेमण्याचे आदेश आहे. वन कार्यालयातील कर्मचारी, प्राणी संग्रालय, रोपवाटिका, वन्यजीव, जंगलातील वणवा-आगी नियंत्रण करणारी यंत्रणा, वृक्षारोपण, गस्त घालणे ही कामेही सुरू राहतील. विलगीकरण कक्षातील यंत्रणेसाठीही दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात सर्व औद्योगिक व वाणिज्यीक प्रतिष्ठाने व कामाच्या ठिकाणी सुरुवात करण्यापूर्वी एसओपी जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची इन्सीडन्ट कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार तेथे सर्व खात्याचे काम चालेल. अत्यावश्यक सेवेकरिता तेच पासेस निर्गमित करतील. सर्व आरोग्य सेवा सुरू राहतील.एपीएमसी, किराणा, दुध, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, गॅरेज, मोबाईल दुरुस्तीला परवानगीनगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारती व सर्व प्रकारच्या औद्योगिक प्रकल्पाचे बांधकाम, नवीनीकरण ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम.नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे स्थानिक मजूर उपलब्ध असेल तर पुढे सुरू राहतील. या कामांसाठी बाहेरुन मजूर आणता येणार नाही.वैद्यकीय, पशु वैद्यकीय सेवांसाठी व्यक्तींच्या हालचाली ग्राह्य राहील. वस्तू खरेदीसाठी खासगी वाहनांना परवानगी. चारचाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त केवळ एक तर दुचाकी वाहनावर केवळ चालकाला परवानगी असेल.जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरून येणारे सर्व कर्मचारी.शेती व फळबागा संबंधी कामे पूर्णपणे कार्यरत राहतील. शेतकरी व शेतमजुरांना शेतविषयक कामे करण्यास मुभा.कृषी उत्पादने, खरेदी यंत्रणा, शेतमालाचे विपणन, हमी भावाने खरेदी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंडी सुरू राहील. शेतीविषयक यंत्रे व सुटे भाग विक्री व दुरुस्ती दुकाने, त्यांच्या पुरवठा साखळीसह सुरू राहतील.शेतीकरिता भाडे तत्वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर, रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे याचे उत्पादन, वितरण व किरकोळ विक्री सुरू राहील. शेतमालाची काढणी व पेरणी करणाऱ्या हार्वेस्टर व अन्य कृषी अवजारांची आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतूक सुरू राहील.मासेमारीचे सर्व व्यवसाय, वाहतूक, पशु विभागाशी संबंधित दुध संकलन प्रक्रिया, वितरण-विक्री, पशु पालन, कुकुटपालन, जनावरांच्या छावण्या, गो-शाळा, बँका, एटीएम, आयटी सेवा, बँकिंग आदी सेवा सुरू राहतील.इलेक्ट्रीशियन, संगणक, मोबाईल दुरुस्ती, वाहन दुरुस्ती केंद्र, नळ कारागीर, सूतार, ग्रामीण भागातील विटभट्टी यांची कामे सुरू राहतील.जीवनावश्यक वस्तू विकणारे प्रतिष्ठान, धान्य व किराणा, फळे व भाज्या, दूध, अंडी, मांस, मच्छी, पशु खाद्य, त्यांचा चारा विक्रीची दुकाने सुरू राहतील. घरपोच सेवा देण्याला अधिक प्राधान्य असेल.महामार्गावरील ट्रक दुरुस्ती व ढाब्यांची दुकाने, कुरिअर सेवेसह काही आस्थापनांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.१५ एप्रिलच्या आदेशात सामाजिक क्षेत्र, मनरेगाची कामे, सार्वजनिक सुविधा, वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याशिवाय इतर विविध क्षेत्रातील अनेक कामांना मंजुरी दिली गेली.या सेवा बंदच राहतील, अंत्यविधीत केवळ २०संचारबंदी काळात ३ मेपर्यंत सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे प्रवासी वाहतूक, सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या बसेस आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास-वाहतूक, सर्व शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग, औद्योगिक व वाणिज्यीक आस्थापना, आतिथ्य सेवा, सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायाम शाळा व क्रीडा कॉम्पलेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेम्बली हॉल व इतर तत्सम ठिकाणे, टॅक्सी आणि कॅब (आॅटो व सायकलरिक्षासह), सामाजिक, राजकीय कार्ये, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर मेळावे, सर्वधार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणी बंद राहतील. अंत्यविधी प्रसंगी २० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस