लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी सरकारने घेऊन त्यांना तातडीने मदत देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे. वाघग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने न सोडविल्यास आणि या शेतकऱ्यांना मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार गवळी यांनी दिला आहे.शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रथम सरकारी यंत्रनेला सूचना देऊन वाघग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच खासदार भावना गवळी यांना वेळ पडल्यास रस्त्यावर उतरा, पण वाघग्रस्त भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले आहे. खासदार भावना गवळी वाघग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या तसेच मागण्या जाणून घेणार आहे. याव्यतिरिक्त नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेचा आढावा घेणार आहे. वन क्षेत्राला लागून असलेल्या शेतांना तारकुंपण लावण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे तसेच काही भागात जंगलातील जनावरे शेतीकडे येऊ नये यासाठी जंगलाला तारकुंपण घालण्याची मागणी करण्यात आली.वनविभागाचे शूटर्स वापराशार्पशुटर नवाबवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे. पॅरा ग्लायडर, विदेशी कुत्रे यावरही झालेला खर्च व्यर्थ ठरला. वन विभागात चांगले शूटर आहेत. नवाबला परत पाठवून वन विभागातील शुटर्सचा या मोहिमेसाठी वापर करावा, अशी मागणीही खासदार भावना गवळी यांनी केली आहे.२० गावांमधील नागरिकांमध्ये दहशतराळेगाव, कळंब तालुक्याच्या जवळपास २० गावातील शेतकरी वाघिणीच्या दहशतीमुळे शेतीची काळजी घेऊ शकले नाही. त्यामुळे शेकडो हेक्टरातील पीक करपले आहे. अनेक भागात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे वाघग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये रोख मदत देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
वाघग्रस्तांची जबाबदारी घेण्यास भाग पाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:34 PM
नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे.
ठळक मुद्देभावना गवळी : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी