शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

भागीदारांनीच केली आठ कोटी रुपयांची फसवणूक

By सुरेंद्र राऊत | Published: August 22, 2023 6:57 PM

आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम

यवतमाळ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे घेण्यासाठी दोघांनी भागीदारी केली. त्या मित्रांमध्येच व्यवहारातील हिशेबाचा वाद झाला. यात दुसऱ्याने परस्पर खोटे दस्तऐवज तयार करून ८ कोटी ३० हजार ५४० रुपये आपल्या बॅंक खात्यात वळते करून घेतले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आठजणांविरुद्ध फसवणूक झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. 

शरद सुभाषचंद्र भुत (रा. बाजोरियानगर) यांनी अनिल सीताराम सेवदा (रा. जिरापुरे ले-आऊट, अमराई) यांच्यासोबत भागीदारीत श्री श्यामबाबा इंजिनिअर्स ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर या नावाने कंपनी सुरू केली.  यातून विविध ठिकाणी शासकीय कंत्राट मिळवत प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेचे काम सुरू केले. अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात या भागीदारीतील कंस्ट्रक्शन कंपनीने कामे केली. अनिल सेवदा व शरद भुत या दोघांचे संयुक्त बॅंक खाते निविदेसोबत देण्यात आले होते. त्यातच केलेल्या कामाचा मोबदला आठ कोटी रुपये जमा झाला.

मात्र नंतर अनिल सेवदा यांनी संगनमत करून गडचिरोली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक, अचलपूर जि. अमरावती कार्यकारी अभियंता, गडचिरोली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, रमेश पी. गंपावार रा. एटापल्ली जि. गडचिरोली, प्रताप व्यंकट स्वामी कोलमपल्ली रा. सिरोंचा, चुन्नीलालजी दुर्गाप्रसाद शर्मा रा. धारणी या सर्वांनी संगनमताने संयुक्त बॅंक खात्यात कामाचा मोबादला जमा केला नाही. परस्पर इतर खात्यांमध्ये ही रक्कम वळती केली, असा आरोप तक्रार शरद भुत यांनी केला आहे.

या प्रकरणी बनावट बॅंक खाते व दस्त याचा वापरही केल्याचा आरोप आहे. यावरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात अनिल सेवदासह आठजणांविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धिरेंद्रसिंग बिलावल करीत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळfraudधोकेबाजी