समता पर्व प्रतिष्ठान : अनुराग गुजर दुसरा तर मनीष मानकर ठरला तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी यवतमाळ : समता पर्व प्रतिष्ठानद्वारा आयोजित ‘समता पर्व-२०१७’मध्ये यवतमाळ आयडॉलचा मानकरी परवेज शहा ठरला. द्वितीय बक्षीस अनुराग गुजर तर तृतीय बक्षीस मनीष मानकर यांनी पटकाविले. युवा गायकांना मंच उपलब्ध करून देण्याची संधी आणि महात्मा जोतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गीतातून अभिवादन करण्यासाठी मागील १३ वर्षांपासून हा कार्यक्रम घेतला जात आहे. १० ते १२ एप्रिल दरम्यान समता पर्वमध्ये यवतमाळ आयडॉलचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते २८ वयोगटातील १११ युवक-युवतींनी यात पहिल्यांदा नोंदणी केली. नोंदणी झालेल्या स्पर्धकांची आॅडिशन घेऊन यातून पहिल्या फेरीत २६ स्पर्धकांची निवड करण्यात आली. यातून अंतिम फेरीसाठी १२ स्पर्धक निवडले गेले. या १२ स्पर्धकांची समतागीत फेरी घेवून यातून तीन बक्षीस व एक प्रोत्साहनपर बक्षिसासाठी निवड करण्यात आली. रामजी आडे स्मृतिप्रीत्यर्थ प्रथम बक्षीस यवतमाळ आयडॉल विजेता परवेज शहा यांना देण्यात आले. यावर्षीपासून अन्नपूर्णा नगराळे स्मृतिप्रीत्यर्थ प्रोत्साहनपर बक्षीस समता पर्वचे अध्यक्ष किशोर भगत, अनिल आडे, प्रकाश भस्मे, सिद्धार्थ भवरे, हरिदास मेश्राम, इंजि.दीपक नगराळे आदींच्या हस्ते देण्यात आले. परीक्षक म्हणून गायक अनिल खोब्रागडे, नत्थू पेठारे, रुद्रकुमार रामटेके व अंजू फुलझेले यांनी काम पाहिले. त्यांचा शाल व प्रमाणपत्र देऊन किशोर भगत, अशोक वानखडे व मंगला दिघाडे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यवतमाळ आयडॉलमध्ये सहभागी गायक कलावंतांना नटराज आॅर्केस्ट्राचे बाबा चौधरी, किशोर सोनटक्के आणि चमूची संगीत साथ लाभली. स्रेहल नगराळे, प्रांजली राऊत, आकाश ढोक व अनिता इंगोले यांनी उद्घोषक म्हणून कामगिरी पार पाडली. त्यांना सहभाग प्रमाणपत्र विजय रंगारी, मिलिंद वाळके, जनार्दन मनवर, संजय तरवरे यांच्याकडून प्रदान करण्यात आले. यवतमाळ आयडॉलच्या यशस्वीतेसाठी प्रा.अंकुश वाकडे, अॅड.रामदास भगत, जयश्री भगत, अर्चना खरतडे, रुचिका पिसे, के.एस. नाईक, मनीष टोकसे, दिनेश भगत, गजानन चौकडे आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
परवेज शहा ठरला यवतमाळ आयडॉल
By admin | Published: April 17, 2017 12:22 AM