शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

पाटणबोरी ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर

By admin | Published: May 28, 2016 2:27 AM

पांढरकवडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरीला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

अतिक्रमणांचा विळखा : ग्रामसेवक-पदाधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची दिशाभूल, गावात घाणीचे साम्राज्यनीलेश यमसनवार पाटणबोरी पांढरकवडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरीला विविध समस्यांनी ग्रासले आहे. गावात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. विकास कामांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावात काही भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक भागात नाल्या तुंबल्या आहेत. पथदिवेसुद्धा अनेकदा बंद राहात असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.पाटणबोरी ही पांढरकवडा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यात नवीन सदस्य निवडून आले. आठ महिने लोटूनही गावातील विकास कामे रखडली आहे. येथील ग्रामपंचायतीला १४ वा वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना, तसेच विविध योजनेतून सुमारे ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून प्रथम पाणी टंचाई दूर करण्याकरिता काही ठिकाणी नवीन बोअर मारल्या, तर काही जुन्या बोअरवेलची दुरूस्ती केली. विविध भागात आठ टाकी लावण्याचे काम अद्याप सुरूच आहे. या आठपैकी केवळ तीनच टाक्यांतून पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित पाच टाक्या लावण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. ते उन्हाळा संपल्यानंतरच पूर्ण होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त ३० लाखांच्या निधीतून १० लाख रूपये पाणी पुरवठ्याच्या कामात बोअरवेल मारणे, पाईपलाईन टाकणे, टाकीपर्यंत पाणी नेऊन त्याला नळ व तोट्या लावणे, यासाठी खर्च केले जात आहे. मात्र अद्याप ग्रामस्थांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गावातील पाण्याच्या टाक्या शोभेच्या ठरत आहे. ग्रामपंचायतीने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता विशेष कोणतेच प्रयत्न केले नाही. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून पाणी टंचाई दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.गावात खुनी नदीच्या पात्रात कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र हा बंधारा अद्याप दुर्लक्षित आहे. या बंधाऱ्याला बॅरेजेस लावल्यास पाणी थांबून गावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन जनावरांना, शेतीलासुद्धा पाणी मिळू शकते. मात्र ग्रामपंचायतीने त्या दृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही. परिणामी पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत आहे. ग्रामपंचायतीकडे उरलेल्या २० लाखांच्या निधीतून या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. खुनी नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडल्यानंतर तेच पाणी गावात पुरवठा केल्यास गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहू शकते. सध्या भूगर्भातील पाणी वापरामुळे गावातील अनेक भागातील बोअर आटत आहे. ग्रामस्थांना दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. महावीरनगर, बालाजीनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक तीनमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने नागरिकांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावातील मुख्य रस्त्यांबाबतही ग्रामपंचायत उदासीन आहे. रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. रस्ते दुरूस्तीसाठी ग्रामपंचायत पाऊल उचलण्यासत यार नाही. आमदार राजू तोडसाम यांनी पाटणबोरी हे गाव दत्तक घेतले आहे. आमदार दत्तक गाव योजनेतून निधी मिळविण्यासाठीही उदासीनता दिसून येत आहे. हा निधी मिळवून गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यांची समस्या नेहमीसाठी निकाली निघू शकते. या रस्त्यावरील डांबर उखडल्याने रस्त्यावर केवळ खड्डेच खड्डे दिसत आहे. मात्र ग्रामपंचायत रस्ता दुरूस्तीतीसाठी पुढाकार घेण्यास तयार नाही. तालुक्यात मोटे गाव असून गावात साधे बसस्थानक नाही. ग्रामीण रूग्णालय नाही. नायब तहसीलदार कार्यालय नाही. गावात केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. गावाचा विस्तार, क्षेत्रफळ व लोकसंख्येचा विचार करता येथे एका राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता आहे.