लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वडकी ते खडकी आणि खैरी ते माढळी दरम्यानच्या रस्त्याची स्थिती पावसानंतर अत्यंत दयनीय झाली आहे. या दोन्ही मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे ५ आॅगस्टला याच मार्गावरून मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा तालुक्यात येणार आहे. वडकी-खडकी हा केवळ तीन किलोमीटरचा मार्ग आहे. राळेगाव-वडकी रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाला असला, तरी या तीन किलोमीटरपैकी जवळपास एक किलोमीटरचा रस्ता अद्याप डांबरीच आहे. पहिल्या पावसामुळे या भागात वाढलेल्या मोठ्या प्रमाणावरील जड वाहतुकीमुळे व रेतीच्या जड वाहनांमुळे रस्त्याची एैसीतैसी झाली आहे. वैध आणि अवैध वाहतुकीमुळे या मार्गावर विपरित परिणाम झाला आहे.रिधोरा फाटा व वाढोणाबाजार गावाजवळ सिमेंट रोड कंत्राटदार कंपनीने नवीन पुलाची बांधणी केली. मात्र या पुलांना जोडणारे अॅप्रोच रोड अद्यापही बांधण्यात आले नाही. त्यामुळे वाहतूक जुन्याच डांबरी रस्त्यावरून होत आहे. या ठिकाणचे डांबरी रस्तेही दयनीय झाले आहे. खैरी ते माढळी हा मार्ग सुरूवातीस जवळपास ८-१० किलोमीटरपर्यंत दयनीय होता. तेथे वारंवार चिखल साचतो. वाहने स्लिप होतात. रस्त्याखाली घसरतात, उलटतात. त्यामुळे अनेकदा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. हा मार्ग मारेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित येतो. या विभागाचे रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. यात्रेच्या निमित्ताने रस्त्याची दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यात्रेच्या निमित्ताने पोलिसांकडून रस्त्याची पाहणीमाढणी ते खैरी मार्गानेच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा राळेगाव तालुक्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याची अप्पर पोलीस अधीक्षक नरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, वडकीचे ठाणेदार प्रशांत गीते यांनी पाहणी केली. वडकीनंतर खडकीमार्गेच मुख्यमंत्री राळेगावाला पोहोचणार आहे. त्यामुळे या मार्गाची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली. पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला यो दोन्ही रस्त्यांच्या दुरूस्ती, डागडुीजी संदर्भात आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
महाजनादेश यात्रेचा मार्ग दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 9:32 PM
तालुक्यातील वडकी-खडकी आणि खैरी ते माढळी रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. याच मार्गाने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार आहे, हे विशेष. त्यामुळे या मार्गाची आता तातडीने दुरूस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देवडकी-खैरी-माढळी रस्ता : पोलिसांकडून पाहणी, बांधकामला विविध सूचना