शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘स्वातंत्र्या’च्या चित्रात सापडली ‘समते’ची वाट

By admin | Published: August 19, 2016 1:07 AM

एक चिमुकली तिरंगा धरून पुढे सरसावली आहे.. तिच्या मागे दोन्ही पायांनी अपंग मुलगी धडपडतेय....

बघा एका फोटोची किमया : पाच बहिणींना मिळाला समाजाच्या मदतीचा हात यवतमाळ : एक चिमुकली तिरंगा धरून पुढे सरसावली आहे.. तिच्या मागे दोन्ही पायांनी अपंग मुलगी धडपडतेय.... तिला आणखी एक विद्यार्थी आधार देतोय... हे दृश्य सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी ‘लोकमत’ने प्रकाशित केले अन् लोकशक्ती फोटोतील त्या अपंग मुलीचा शोध घेत तिच्या घरापर्यंत पोहोचली. तिच्या घरातले अभावग्रस्त जिणे पाहून ‘लोक’मत गहिवरले. मदतीसाठी अनेक जण सरसावले. झोपडीतल्या पाचही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारांनी लोकांनी स्वीकारली... ही किमया घडली केवळ एका छायाचित्रामुळे ! छायाचित्रातून उलगडत गेलेली अन् समाजाची माया मिळविलेली ही कहाणी यवतमाळजवळच्या बोदड गावातली. छायाचित्रणाचे मोल अधोरेखित करणारा हा प्रकार जागतिक छायाचित्रदिनीच उजेडात यावा, हाही योगायोगच. वाघापूर आणि लोहारा ग्रामपंचायतीच्या मध्यभागी वसलेले बोदड गाव चौसाळा मार्गावर येते. शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात फुकटनगर ही अतिक्रमित वस्ती आहे. याच ठिकाणी पारधी कुटुंब वास्तव्याला आहे. रोजमजुरी करून ते पोट भरते. १५ आॅगस्टला ध्वजारोहणासाठी जाणारी अपंग रविना आणि तिची शिक्षणाची जिद्द असा फोटो छायाचित्रकार मनोज कटकतलवारे यांनी टिपला होता. ‘लोकमत’ने तो पहिल्या पानावर प्रसिद्ध केला. बोदडमधील फुकटनगरात एका पडप्याच्या खोलीत पारधी कुटुंबातील ५ मुली आणि पती-पत्नी असे सात सदस्य राहातात. हे झोपडेही पडण्याच्याच अवस्थेत आहे. राजू पारधी यांना ५ मुली आहेत. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. रोजमजुरीवर सात जणांचे कुटुंब चालविणे अवघड. यामुळे संगीता नावाच्या मुलीने नववीपासूनच शिक्षण सोडले. ती धुणी-भांडी आणि वीटभट्टीवर काम करुन आईवडिलांना मदत करते. विशेष म्हणजे, रविनाला शाळेत पोहोचविणे आणि घरी आणण्यासाठी तीच मदत करते. रविना पाचव्या वर्गात आहे. ती दोन्ही पायांनी अपंग आहे. यामुळे तिला शाळेत जाता येत नाही. पण शिक्षणाची आवड आहे. हुशार असल्याने तिला शाळेत पाठविले जाते. परंतु पुढील काळात शिक्षण झेपावणार नाही, अशीच अवस्था आहे. पुष्पा ही सर्वात मोठी मुलगी आहे. ती बारावीमध्ये पीपल स्कूलमध्ये कॉमर्सचे शिक्षण घेत आहे. तिची शाळा फार दूर आहे. घरचे सर्व काम आटोपून तिला कॉलेजला जाव लागते. विशेष म्हणजे तिला दहावीमध्ये ६८ टक्के गुण मिळाले आहेत. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने पुष्पा चिंतेत आहे. नंदना सहाव्या वर्गात आहे. तर सहयोगीता चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ‘लोकमत’च्या छायाचित्राची दखल घेत लोहारा आणि वाघापूरच्या जागृत नागरिकांनी फुकटनगरातील पारधी यांचे घर गाठले. त्यांनी रविनाच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यासोबतच कपडे आणि आरोग्याच्या प्रश्नावरही ही मंडळी संपूर्ण लक्ष देणार आहे. संगीताला पुन्हा शाळेत टाकण्यासोबत पुष्पाच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. पुष्पाची शाळा दूर असल्याने तिला सायकल मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाघापूरचे माजी सरपंच संजय कोल्हे, लोहाराचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप फरकाडे, लोहाराच्या माजी सदस्या लिला बनसोड, वाघापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भगत, शिवसेनेच कार्यकर्ते सुनील सानप, अशोक रामटेके आणि प्रमोद पंडितकर यांनी पारधी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. (शहर वार्ताहर) आजी गहिवरल्या, रविनाने दिले फुल लोहारा-वाघापुरातील लोकांनी मदतीचा हात पुढे करताच आजीच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यांनी पारधी कुटुंबाला देत असलेल्या मदतीबाबत सर्वांचे आभार मानले. तर अपंग रविनाने तिच्या बागेतील फुल मदत करणाऱ्या दात्यांना दिले.