लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेला ४२ वर्षीय इसम कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. गडबड झाल्याचे लक्षात येताच तो रुग्ण पळून गेला व त्याचा शोध घ्यावा असा आदेशही जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे पत्र काढण्यात आले. २४ जुलै रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्या ४२ वर्षीय रुग्णाला सोडून देण्यात आले. मात्र २५ जुलै रोजी पत्र काढून पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला आहे, त्याचा शोध घेऊन दाखल करण्यात यावे असे पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावरून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वैद्यकीय यंत्रणेची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. कोरोना रुग्णांच्या संदर्भात एकाच वेळी आरोग्य विभागाच्या तीन आस्थापना काम करीत आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना समन्वयक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त यंत्रणा कार्यरत आहे. रुग्ण वाढत असल्याने आता या यंत्रणांवर ताण येत असून असे प्रकार घडत असल्याचे दिसते.आर्णीच्या महिलेचा मृत्यू, २५ नवे रुग्णजिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी २५ पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १९ रूग्ण पांढरकवडा येथील आहेत. तर आर्णी शहरात एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे कोरोना बळींचा आकडा २८ वर पोहोचला आहे. २९ जणांना सुटी देण्यात आली. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या २३८ वर पोहोचली आहे. रविवारी आर्णीमधील मोमीनपुरा भागातील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १४ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा शहरातील १० पुरूष, ९ महिला, पुसद शहरातील एक महिला आणि भंडारी येथील एक पुरूष अशा दोन रुग्णांची नोंद पुसदमध्ये करण्यात आली. वणी शहरातील एक पुरूष, एक महिला, यवतमाळातील तायडेनगरातील एक पुरूष आणि नेर शहरातील एक पुरूष पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत ७४४ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. बºया झालेल्या रूग्णांचा आकडा ४८० वर पोहचला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती उपचारानंतर निगेटिव्ह झाली, तरीही ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर कुणाच्या संपर्कात आल्यास पुन्हा पॉझिटिव्ह येऊ शकते, नेमका असाच प्रकार या घटनेत झाला असावा. अन्यथा पॉझिटिव्ह व्यक्तीला निगेटिव्ह म्हणून सोडणे शक्य नाही.- डॉ. तरंगतुषार वारेजिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ.
कोरोना वार्डातून डिस्चार्ज केलेला रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 5:00 AM
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे पत्र काढण्यात आले. २४ जुलै रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्या ४२ वर्षीय रुग्णाला सोडून देण्यात आले.
ठळक मुद्देपळून गेल्याचा देखावा : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार